११-१-१९५० परकीयांच्या गुलामगिरीचा प्रसंग पुन्हा आला तर तो आत्मनाश ठरेल - Page 226

१८८ डॉ. बाबासाहेब आंवेडकर लेखन आणि भाषणे

व्यक्तिनी व संस्थांनी नावे नोंदवावी

ज्या कोणा व्यक्तिना अगर संस्थाना, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना हार अर्पण करावयाचे असतील त्यांनी प्रथमतः आपली नावे मुंबई दलित फेडरेशनच्या ऑफिसमध्ये नोंदविली पाहिजेत. आयत्यावेळी गोधळ टाळण्याच्या दृष्टीने अशी पद्धती अवलंबिली पाहिजे. स्वागतासाठी भव्य मंडप उभारण्यात येईल. त्यात लाऊडस्पीकरची व्यवस्था ठेवण्यात येणार आहे. असे पत्रक मुंबई दलित फेडरेशनच्या जनरल सेक्रेटरीने काढले.

भारत सरकारचे कायदेमंत्री ना. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या पत्नी सौ. सवितादेवी यांच्या समवेत ता. २ जानेवारी १९५० रोजी सोमवारी संध्याकाळी ६-३० वाजता विमानमार्गे दिल्लीहून मुंबईस आले. डॉ. बाबासाहेब व सौ. माईसाहेब सांताक्रूझ विमानतळावर उतरले तेव्हा आनंदी दिसत होते. त्यांच्या स्वागतासाठी मुंबई शहर व उपनगर दलित फेडरेशनचे कार्यकर्ते हजर होते. याशिवाय इतर अस्पृश्य बंधु भगिनींचीही अलोट गर्दी सांताक्रूझ विमानतळावर त्यांचे दर्शनार्थ लोटली होती.

मनोहर दृश्य व हारतुरे

डॉक्टरसाहेबांनी येतेवेळी गॅबर्डिनचा सूट परिधान केला होता आणि सौ. माईसाहेबांनीही तशाच प्रकारच्या रंगाचे जरीचे पातळ पेहरले होते. ज्यावेळी, डॉक्टरसाहेब व माईसाहेब विमानातून उतरले व त्याना नेण्यासाठी वाट पाहणाऱ्या ट्यूरिंगकडे आले तेव्हा, आंबेडकर झिंदाबाद; थोडे दिनमें भिमराज' अशा घोषणा स्वागतास जमलेल्या अस्पृश्य बंधु भगिनींनी दिल्या नंतर डॉक्टर बाबासाहेब यांना हार अर्पण करण्यात आले आणि त्यांची मोटार निघून गेली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा मुंबईतील मुक्काम ता. १३ जानेवारी १९५० पर्यंत राहील असे समजते.

डॉ. बाबासाहेबांच्या येत्या आगमनप्रसंगी मुंबईमध्ये त्यांचे प्रचंड जाहीर स्वागत करण्यात येणार आहे. हे गेल्या 'जनते' च्या अंकात प्रसिद्ध झाले आहे. त्यासंबंधी, दलित फेडरेशन मुंबई शहर व उपनगर शाखेच्या स्वागत समितीने खालील पत्रक प्रसिद्धीसाठी दिले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर व सौ. डॉ. माईसाहेब आंबेडकर हे उभयता सोमवार ता. २-१-१९५० रोजी सायंकाळी ६.३० वाजता मुंबईस आले आहेत हे वृत्त कळविण्यात आम्हास अत्यानंद होत आहे. डॉ. बाबासाहेबांच्या आगमनास आपण नेहमीच उत्सुक असतो. त्यातून भारतीय घटनेची महान कामगिरी