परकियांच्या गुलामगिरीचा : . . . तर तो आत्मनाश ठरेल १८९
बजावून ते प्रथमत: मुंबईस येत असल्याकारणाने आपला उत्साह द्विगुणित झाला असल्यास नवल नाही. तेव्हा, अशा प्रसंगी डॉ. बाबासाहेबांचे जाहीर प्रचंड
स्वागत व्हावे अशी तुम्हा सर्वांची उत्कट" इच्छा असणे अगदी स्वाभाविक आहे. ही गोष्ट जाणूनच, दलित फेड़रेशन-मुंबई शहर व उपनगर शाखेने
र् जी i ता. १-१-१९५० रोजी तातडीची बैठक बोलावून खालील ठराव सम्मत केला
` भारतीय घटना बनविण्यात, प्रशंसनीय यश संपादून डॉ. बाबासाहेब
आंबेडकर, भारतीय अस्पृश्य चळवळीच्या माहेरघरी आपल्या मुंबईलः
पहिल्यांदाच येत आहेत. तेव्हा त्यांचे जाहीर स्वागत करण्यात येऊन त्यांच्या
* कर्तबगारीबद्दल अस्पृश्य जनतेस वाटणाऱ्या अपरिमित आनंदाचे 'प्रतीक'
म्हणून भारतीय घटनेची प्रत त्या आकाराच्या सुवर्ण वेष्टनामधून त्यांना अर्पण
करण्यात यावी." FC
वरील ठरावानुसार ता, २ जानेवारी १९५०. रोजी स्वागत समितीने
डॉ. बाबासाहेबांची भेट घेतली. डॉ. बाबासाहेब व सौ. माईसाहेब यांनी कृपावंत
होऊन जाहीर स्वागत-समारंभास हजर राहाण्याचे अभिवचन दिले आहे.
सदर सत्कार-समारभासंबंधी खालील गोष्टी जनतेच्या माहितीसाठी जाहीर
करण्यात येत आहेत
(१) स्वागत समारंभाची . जागा, तारीख व वेळ या संबंधीचा' तपशील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सोयीप्रमाणे लवकरच पत्रक'नं. २ मधून व 'जनता' 'साम्ताहिकातून जाहीर करण्यात येईल |
(२) सुवर्ण प्रतिकासाठी, दलित फेडरेशन, मुंबई शहर व उपनगर शाखेच्या सवे वॉर्डस्मधील जुन्या सभासदांनी व ज्यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत
अशा नव्या संभासदांनीही प्रत्येकी ३ रुपये तारीख ५ जानेवारी १९५० च्या आत
दिले पाहिजेत
शिवाय, मुंबईतील दरेक अस्पृश्य बंधु-भगिनींनी कमीत कमी चार आणे"तरी
द्यावेत अशी आमची आग्रहाची ,विनंती आहे.
- स्वागत समितीतर्फे चार आणे किमतीची तिकीटे छापण्यात आली आहेत. या
- तिकिटांवर अनुक्रमे नंबर व दलित फेडरेशन मुंबई शहर आणि उपनगर शाखेच्या जनरल सेक्रेटरीच्या सहीचा शिक्का राहील. तिकिटे घेतल्याशिवाय कोणीही पैसे. देऊ नयेत. वरील प्रकारची तिकिटे ज्यांचेकडे असतील ते निधी गोळा
ननि (वाय) ४११--१४