११-१-१९५० परकीयांच्या गुलामगिरीचा प्रसंग पुन्हा आला तर तो आत्मनाश ठरेल - Page 228

डॉ. बाबासाहेब आंवेडफर लेखन आणि भाषणे १९०

करणारे अधिकृत लोक आहेत असे समजावयास हरकत नाही. चार आण्यापेक्षा कोणी अधिक रक्कम दिल्यास तिचा साभार स्वीकार केला जाईल. मात्र त्या रकमेच्या प्रमाणात पावत्या जरुर घ्याव्यात.

(3) स्वयंसेवक पथक व डॉक्टरसाहेबांना अर्पण करावयाचे हारतुरे यासंबंधीची

माहिती फेडरेशनच्या मध्यवर्ती ऑफिसमध्ये मिळेल.

जाहीर झाल्याप्रमाणे बुधवार, ता. ११ जानेवारी १९५० रोजी, दलितांचे सर्वश्रेष्ठ नेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर व सौ. डॉ. माईसाहेब आंबेडकर यांचा जाहीर सत्कार मुंबई शहर उपनगर दलित फेडरेशनच्या विद्यमाने मुंबईतील नरेपार्क मेदारावर साजरा करण्यात आला. या प्रसंगी दोन लाखाच्या वर, दलित बंधु-भगिनींचा समुदाय हजर होता. यामध्ये भगिनीवर्गाची उपस्थिती अफाट होती. आपल्या भक्तिभावाची खूण म्हणून दलित बांधवांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना घटनेच्या प्रतीच्या आकाराचा सुवर्ण करंडक व २,००० रुपये जाहीरपणे अर्पण केले आणि त्यांचेवरील आपली निष्ठा अढळ आहे हे सर्व जगास पटवून दिले.

खरोखरीच अभूतपूर्व समारंभ

सदर सत्कार समारंभाच्या तयारीसाठी जो अगदी तोकडा वेळ मिळाला त्याकडे पाहाता हा समारंभ अक्षरशः अभूतपूर्वच म्हटला पाहिजे. ता. ११ रोजी असलेल्या समारंभाची माहिती आदल्या दिवशी म्हणजे ता. १० रोजी दलित बांधवांना देण्यात आली. तेव्हापासून, मुंबई दलित फेडरेशनच्या कार्यकर्त्यांची एकच धमाल उडाली होती. रातोरात, हँडबिल वाटून, थाळ्या पिटून आणि मोटारमधून मोहल्ल्या मोहल्ल्यात प्रत्यक्ष जाऊन डॉ. बाबासाहेबांच्या सत्कार समारंभाची माहिती देण्यात आली आणि एवढ्या अत्यंत अल्प अवधीत नाही म्हटले तरी २,०० ००० समुदाय जमला, ही गोष्ट अभूतपूर्व नव्हे असे कोण म्हणेल? एवढा विराट समुदाय कोणत्याही पुढाऱ्याच्या सत्कारास गेल्या ५० वर्षात मुंबईत जमला असेल, असे मुळीच वाटत नाही.

एकंदर व्यवरथा शिस्तबद्ध

सुमारे ४ वर्षाच्या कालांतराने दलित फेडरेशनचा नीलवर्णी ध्वज नरेपार्कच्या भव्य मैदानावर डौलाने फडकत होता. नरेपार्कच्या चोहोबाजूने एखाद्या महायात्रेप्रमाणे दलित जनतेची नुसती रीघ लागली होती. त्यांच्या व्यवस्थेसाठी व शिस्तीसाठी स्वयंसेवक ररत्याच्या दुतर्फी व मैदानाच्या सभोवार बंदोबस्ताने