११-१-१९५० परकीयांच्या गुलामगिरीचा प्रसंग पुन्हा आला तर तो आत्मनाश ठरेल - Page 229

परकियांच्या गुलामगिरीचा . . . . तर तो आत्मनाश ठरेल १९१

उभे होते. समारंभाकरता लहानसा पण टुमदार मंडप उभारण्यात आला होता. त्याचप्रमाणे लाऊडस्पीकरची व्यवस्थाही करण्यात आली होती. सामान्य पाहुणे मंडळीकरता सुमारे ५०० खुर्च्या ठेवण्यात आल्या होत्या. स्त्रियांकरता खास जागा ठेवली होती. एकूण समारंभाची व्यवस्था चोख ठेवण्यात आली होती.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आगमन

सायंकाळी ६.३० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आगमन झाले तेव्हा, 'आंबेडकर झिंदाबाद' च्या गगनभेदी घोषणा जनसमुदायाने केल्या. नरेपार्कचे गच्च भरून गेलेले मैदान या घोषणेमुळे हादरून गेले. डॉ. बाबासाहेब व्यासपीठावर येताच फोटोग्राफरची एक पलटणच उभी राहिली आणि त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या निरनिराळया 'पोजेस' चे फोटो घेण्याचा एकच सपाटा चालविला, कोणी खाली बसून, कोणी गुडघे टेकून तर कोणी तीर कमट्याच्या पवित्र्यात उभे राहून व फ्लॅश लाईट टाकून डॉक्टरसाहेबांचे फोटो घेत असल्याचे ते दृश्य खरोखरीच मनोहर होते.

जनरल सेक्रेटरीचे भाषण

मुंबई शहर व उपनगर दलित फेडरेशनचे जनरल सेक्रेटरी श्री. जे. जी. भातनकर यांच्या छोट्या भाषणाने समारंभास सुरवात झाली. ते म्हणाले,

“डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आम्ही सर्व दलित बंधु-भगिनींना दर्शन व्हावे अशी आमची फार दिवसापासूनची इच्छा होती. परंतु डॉक्टरसाहेबांच्या मागे जी निकडीची कामे आहेत त्यामुळे तसा योग घडवून आणता आला नाही. त्यांनी केलेली घटनेची कामगिरी अभिमानास्पद असल्याने त्यांच्या स्वागताच्या निमित्ताने त्यांचे दर्शन होत आहे आणि त्याबद्दल आम्ही त्यांचे सदैव ऋणी आहोत."

नंतर समारंभाचे अध्यक्ष श्री. डी. पी. गंब्रे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना प्रथम हार अर्पण करून नंतर सुवर्णाचा करंडक व २,००० रुपये अर्पण केले. यावेळी अर्पण-प्रसंगीची छायाचित्रे घेण्यासाठी, पुन्हा.एकदा फोटोग्राफर धावले. करंडक अर्पणाचा समारंभ झाल्यावर, डॉ. बाबासाहेब, सौ. माईसाहेब

यांना अनेक संस्थांकडून व व्यकितिकडून पुष्पहार अर्पण करण्यात

आले. व्यासपीठावर हारतुऱ्यांचा एक मोठा ढीगच साचला होता.

शेवटी, टाळयांच्या प्रचंड कडकडाटात डॉ. बाबासाहेब आंबेडकर भाषण "करावयास उभे राहिले.

अति (वाय) ४११--५४-अ