१९२ डॉ. बाबासाहेब आंवेडकर लेखन आणि भाषणे
डॉ. बाबासाहे आंबेडकर आपल्या भ'षणात म्हणाले,
प्रिय भगिनीनो आणि बंधुनो,
आजच्या समारंभाला हजर राहाण्याची माझी काही तयारी नव्हती. कारण मुंबईत आल्या दिवसापासून जी कामे उरकावयाची होती ती महत्वाची होती आणि त्यामुळे या कार्यामध्ये आजच्या कार्यक्रमाला स्थान देण्याकरता अवसर मिळाला नव्हता. परंतु आज याठिकाणी एवढी मंडळी जमलेली आहेत ठँ नी पाडून आणि गला देण्यासाठी आपण जो करंडक तयार केला आहे तो पाहून मला असे वादू लागले आहे की मी आज या ठिकाणी उपस्थित झालो नसतो ठर एवढ्या मोठ्या प्रचंड जनसमुदायाची मोठी निराशा झाली असती. इतकंच नव्हे तर आपण खर्च केलेला पैसा व्यर्थ गेल्यासारखे झाले असते. त्यामुळे आज आपल्याला तर आनंद झालाच असेल आणि एका प्रकारे माझ्या दृष्टीनेही ही गोष्ट समाधानकारक व आनंदकारक आणि समायोचित अशीच झाली आहे असे मला वाटते (टाळ्या)
आज आपण सर्व मंडळीनी या ठिकाणी सभा घडवून आणली आणि मला हा करंडक दिला हे सर्व करण्याची विशेष आवश्यकता नव्हती. माझ्या अध्यक्षतेखाली व नेतृत्वाखाली बरेच दिवस सभा झालेली नाही ! आणि मलाही आपल्याला दोन शब्द सांगण्याची जरूरी पडली नाही. म्हणून काही लोकं असे म्हणत असत की मी दिल्लीला राहात असल्यामुळे इतर प्रांतात, या प्रांतातही
एकंदर राजकीय क्षेत्रात माझ्या पायाखालची वाळ घसरत. चाललेली आहे. असे म्हणणारे व मानणारे लोक आज येथ हजर असतील तर माझ्या पायाखालची वाळू घसरलेली नसून अधिकच घट्ट झाली असल्याचे त्यांना दिसून येईल. , (प्रचंड टाळया) एखाद्या राजकीय पक्षाने बोलावलेली एवढी मोठी सभा दुसऱ्या कोणत्याही राजकीय पुढाऱ्याच्या अध्यक्षतेखाली भरू शकत असेल, असे मला वाटत नाही. सिनेमा पाहण्यास जसे काही लोक जातात त्याचप्रमाणे काही एक दोन लोकप्रिय पुढाऱ्यांना बघण्यासाठी अथातच गर्दी जमत असेल. परंतु आपल्या -राजकीय पक्षाच्या नेतृत्वाखाली आजही अशा प्रचंड सभा भरतात, त्यावरून आपल्या संघटनेची विधटना झालेली नाही, असे मला वांटते आणि म्हणून माझ्या अभिनंदनासाठी येथे जमलेल्या सर्व स्त्री-पुरुषांचे व सभा चालकांचे मी मनःपूर्वक आभार मानतो. (टाळ्यांचा पुन्हा कडकडाट),
आपल्या राष्ट्राची घटना तयार करण्याची कामगिरी माझ्या शिरावर आली हा एक अनोन्य प्रकार होय. भारताची घटना तयार करण्यासाठी घटनासमिती भरली त्यावेळी माझी दशा काय होती. हे आपल्याला माहीत