११-१-१९५० परकीयांच्या गुलामगिरीचा प्रसंग पुन्हा आला तर तो आत्मनाश ठरेल - Page 231

परकियांच्या गुलामगिरीचा . . . . तंर तो आत्मनाशं ठरेल १९३

असेलच. १९४६-४७ साली झालेल्या निवडणुकीत शेड्यूल्ड कास्ट्स्‌ फेडरेशनचा पराजय झालेला होता, अर्थात या पराभवाबद्दल लाज वाटण्याचे काहीचं कारण नाही. कारण निवडणुकीच्या वेळीं सारे हिंदुस्थान राष्ट्र एका बाजूला होते व आपला पक्ष दुसऱ्या बाजूला होता. एका बाजूला प्रबल अशी राजकीय संघटना होती व दुसऱ्या बाजूला अल्पसंख्य अस्पृश्यांना या संघटनेशी सामना द्यावयाचा होता. ` अर्थात पराजय होणे हेचं आपले भवितव्य होते | | ह

_ परंतु पराजय झाल्यानंतर थांबून चालणार नव्हते. आपल्या लोकांना कोठून तरी घटनासमितीत शिरकाव करून घ्यावयाचा होता. अस्पृश्यांचे राजकीय हक्क घटनासमितीसमोर मांडण्याची संधी आपल्या प्रतिनिधींना सापडावयास पाहिजे होती. हा अत्यंत मोठा बिकट प्रसंग होता.' काँग्रेस वः शेड्यूल्ड कास्ट्स्‌ फेडरेशन यांच्यात करडा विरोध असल्यामुळे या' पक्षाचा प्रवेश घटनासमितीत होऊ, देता कामा नये असा काँग्रेसने निश्चय केला होता ! (शेम, शेम) काय वाटेल ते करून मला घटनासमितीत जाणे काँग्रेस पक्षाने अशक्य केले होते. अखेरीस बंगाल प्रांतातून आत जाण्याचा मार्ग मी शोधून काढला आणि तेथे गेलो. अस्पृश्य वर्गाचे हक्क तेथे मांडता यावेत, त्यांना हिंदुंच्या राज्यात काही सवलती प्राप्त व्हाव्यात, एवढा माझा मर्यादित उद्देश होता

राष्ट्राची घटना आपण तयार करावी, अशी माझी महत्त्वाकांक्षा नव्हती आणि जेथे मला समितीचे सभासद होणेही दुरापास्त होते तेथे काही मला अधिकार गाजविता येईल, काही उत्तम कामगिरी करता येईल अशी कल्पना करणेही शक्य नव्हते. कोणाही माणसाला आत येऊ देऊ पण डॉ. आंबेडकरांना आत घेणार नाही, असे ठरविण्यात आले होते. घटनासमितीचे दरवाजे मला बंद होतेच परंतु त्याबरोबर खिडक्याही बंद करून घेण्यात आल्या होत्या. आजूबाजूची भोकेहीं बुजवण्यात आली होती. परंतु आपल्यां सौभाग्यामुळे व परमेश्वराच्या कृपेमुळे मला आत पाऊल टाकता आले व विधिघटना अशी की [ज्यालां ] [आतं ] [येऊ ] ग्‌ देण्याचा निश्चय केला होता त्याच्याच शिरावर [ही ] [मोठी ] [जबाबदारी ] [टाकण्यात ] आली. (' हियर हियर ' च्या गर्जना) झाली ही गोष्ट [अत्यंत ] [सुदैवाची ] वाची झाली. कारण अशा प्रकारची महान कामगिरी करण्याची [संधी ] [मनुष्यमात्राला ] क्वचितच प्राप्त होते. ही गोष्ट मला भूषणास्पद आहे, तशीच आपल्यालाही ती भूषणास्पद आहे. (टाळ्यांचा कडकडाट)