२६५
प्रामाणिकपणा, कर्तव्याची जाणीव व
राष्ट्रीय हिताची दृष्टी ही महाराष्ट्राची परंपरा
दिल्लीतील सर्व महाराष्ट्रीय संस्थामार्फत ता. २७ जानेवारी १९५० च्या दुपारी १.०० वाजल्यापासून बुहन् महाराष्ट्र भवनामध्ये लोकराज्य दिन मोठ्या थाटाने साजरा करण्यात आला. शहरातील निरनिराळे कार्यक्रम यांची गर्दी लक्षात घेऊन अगदी आटोपशीर व सुटसुटीत असा हा कार्यक्रम आखण्यात आला होता. ठरल्याप्रमाणे बरोबर दीड वाजता श्री. दिगंबरपंत पलुसकर यांच्या गाण्याचा कार्यक्रम सुरू झाला. नंतर बिस्मिल्ला पार्टीचे सनईवादन झाले.
घटनेची कर्तबगारी महाराष्ट्रीयाची
यानंतर नियोजित अध्यक्ष ना. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षपदाची सूचना ना: काकासाहेब गाडगीळ यांनी केली. ही सूचना करताना ना. गाडगीळ म्हणाले "गेल्या कित्येक वर्षापासून हिंदुस्थानची जनता ज्या एका अत्यंत महत्त्वाच्या दिवसाची वाट पाहात होती तो दिवस काल उगवला व पारतंत्र्याचे आणि राजशाहीचे सर्व पाश तोडून हिंदुस्थानच्या लोकराज्यावर शिक्कामोर्तब झाले. अशा या राज्यंघटनेचे प्रमुख कर्ते आज आपल्यामध्ये हजर आहेत. ' इतक्या महत्त्वाची कामगिरी आपल्यापैकीच एका महाराष्ट्रीयाने अत्यंत चोखपणे पार पाडावी याबद्दल आपल्या सर्वांना अभिमान वाटणे साहजिक आहे. या प्रसंगाने दिल्लीतील सर्व महाराष्ट्रीयांतफें मी त्यांचे स्वागत करतो.'' ना. गाडगीळ यांनी नंतर नामदार व सौ. आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण केले.
समारंभाची आवड नाही
नंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे छोटेसे भाषण झाले. ते म्हणाले
दिल्लीतील महाराष्ट्रीय संस्थांमार्फत मला बरेच वेळा निरनिराळया प्रसंगी हजर राहून बोलण्याविषयी विनंती करण्यात आली होती. परंतु गेल्या तीन वर्षात मी घटनासमितीच्या कामात मग्न असल्याने त्या आमंत्रणाचा स्वीकार करू शकलो नाही. अर्थात मी महाराष्ट्रीय समारंभास हजर राहिलो नाही त्याप्रमाणेच
- दुसऱ्या कोणत्याच कार्यक्रमांना गेलो नाही. लोकांनी असा गैरसमज करून
जनता : ४ फेब्रुवारी १९५०.