२७-१-१९५० प्रामाणिकपणा, कत॑व्याची जाणीव व राष्ट्रीय हिताची दृष्टी ही महाराष्ट्राची परंपरा - Page 235

प्रामाणिकपणां, कर्तव्याची जाणीव ` . ... ` हीं महांराष्ट्रांची परंपरा १९७

घेऊ नये की माझा आज येथे गौरव होणार आहे म्हणून मी आलो आहे. तर माझा स्वभाव थोडा एकलकोंडा आहें व अशा समारंभांची मला आवड नाही. साधारणपणे पुस्तक वाचन व माझे काम यापलिकडे माझे मन दुसऱ्या

कशात रमत नसल्यामुळेही मी फारसा कोणत्याचं कार्यक्रमात भाग घेतं

नांही. . ओज आपणा सर्वांनी मला याँठिकांणी बोलावून माझें अभिनंदन केले याबद्दल मीं आभारी आहे |

घटनासमितीवरील माझी कामगिरी फार,मोठी आहे. असे मी मानावयास तयार नाही. कारण ही घटना बनविताना बर्‍याच देशांमधील. निरनिराळ्या घटनांचा अभ्यास करून त्यामधील आपल्या देशास रुचतील.व पचतील अशी-कलमे निवडून ती एकत्रित करणे एवढेच आमचे कार्य होते.. त्याप्रमाणे आम्ही ते केले. . सर्वात महत्त्वाची गोष्ट आम्ही जी करू शकलो ती म्हणजे अखिल भारताची राजभाषा आम्ही एक निश्‍चित करून टाकली. त्याचप्रमाणे एक लिपी करू शकलो असतो तर तीही फार महत्त्वाची गोष्ट झाली असती. परंतु ती गोष्ट गडबडीमध्ये होऊ शकली नाही. आपल्या देशात शेकडो भाषा बोलल्या जातात. अशी अफाट देशाची राजभाषा आपण एक कायम करू शकलो, ही खरोखरच महत्त्वाची गोष्ट

आहे. निरनिराळ्या प्रांतीय भाषा त्या त्या प्रांतात रूढ राहतील असे अद्यापही म्हणतात ; परंतु राजभाषा एक ठरल्यानंतर हिंदच्या प्रत्येक नागरिकास ती भाषा बोलणे प्राप्त होईलच व त्यायोगे आपोआप संघटना होईल. राष्ट्र बलिष्ठ करणे असल्यास अशा संघटनांची आवश्यकता किती आहे हे मी निराळे सांगावयास

पाहिजे असे नाही. |

महाराष्ट्रीयांविषयी बोलणे झाल्यास सध्या आपल्यामध्ये अशी एक वृत्ती निर्माण होऊ पाहत आहे की प्रत्येक क्षेत्रात आपले पाय मागे आहेत. मी ही गोष्ट कबूल करणार नाही व माझी आपणा सर्वांना अशी विनंती आहे की आपणही अशी समजूत करून घेऊ नका. गणसंख्येचा विचार केला तर महाराष्ट्रीयन हे अल्पसंख्यांक आहेत. असे असूनसुद्धा मध्यवर्ती सरकारमध्ये आम्ही दोन महाराष्ट्रीय मंत्री आहोत. रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरशिपचा मानही आपल्यापैकीच एका गृहस्थास मिळाला. त्याचप्रमाणे राजकारण, विद्वता, स्वार्थत्याग वगैरे सर्व गुणात आपला प्रांत मागे आहे, असे समजण्याचे मुळीच कारण नाही. मी तर असे म्हणेन की दुसऱ्या कोठल्याही प्रांतातील प्रजाजनांपेक्षा महाराष्ट्रीय माणूस हा आपल्या कर्तव्याची जास्त चाड राखतो. तो जास्त प्रामाणिक आहे व राष्ट्राकरिता जास्तीत जास्त त्याग करण्याची त्याची तयारी आहे.