२०२ डॉ. वावासाहेव आंबेडकर लेखन आणि भाषणे
मरण टाळण्यासाठी दुर्योधनाच्या मरणाचे गुपित कृष्णास माहित होते. अर्जुनाचे
मुलगा अश्वत्थामा हा जेव्हा कृष्णाने दुष्ट योजना केली. द्रोणाचार्याचा
दिली आणि रणक्षेत्रावर लढत होता तेव्हा कृष्णाने द्रोणाचार्यास विपर्यस्त माहिती धर्मराजास ' नरो वा कुंजरो '' असे विधान करावयास भाग पाडले. कृष्णाच्या फसव्या कृत्यामुळे शिशुपाल एवढा संतापला की कृष्णाला भर दरबारात त्याने शिव्या दिल्या. शिशुपालाच्या या निर्भय वृत्तीमुळे देवादिकांना देखील आनंद झाला आणि कुष्णाची खरडपट्टी केली म्हणून त्याजवर पुष्पवृष्टी जाहीरपणे करण्यात आली. कृष्ण हा देव नव्हता. एवढेच नव्हे तर सामान्य माणसा- पक्षा तो हीन होता, हे सिद्ध करण्यासाठी अशी किती तरी उदाहरणे देता येतील.
म्हणून आपण बुद्ध जयंती साजरी करीत आहोत आणि तुम्हास मी सांगू इच्छितो की जरी सध्या हिंदू धर्माइतका बौद्ध धर्माचा प्रसार भारतात नसला तरी स्वातंत्र्य प्राप्तीपासून जनतेची मते बौद्ध धर्माकडे अधिक झुकत आहेत. तुम्ही घटकाभर विचार करा, जवळ जवळ २,५०० वर्षानी बुद्ध जयंती येथे साजरी केली जात आहे. बौद्ध धर्माकडे आजपावेतो दुर्लक्ष केले तरी बुद्ध जयंती साजरी होते, ही गोष्ट असामान्य नव्हे असे कोण म्हणेल ? स्वातंत्र्यप्राप्तीनंतर ' आपले ' म्हणता येईल, अशा तत्त्वज्ञानाची आपल्याला आवश्यकता आहे. हिंदू संस्कृतीत
आपण पुष्कळ शोधून पाहिले पण त्यात विशेष काहीच सापडत नाही. फक्ल
बौद्ध धर्मामधूनच खऱ्या ज्ञानाचे किरण दिसतात आणि बौद्ध धर्मामुळेच भारत देश महान असल्याचे आपण जगाला सांगू शकतो.
आपल्या राष्ट्र्ध्वजावर बुद्धाचे चक्र आहे. आपली राजमुद्रा बौद्ध तत्त्वज्ञानावर
अधिष्ठित आहे. शिवाय, नवीन भारतीय घटनेप्रमाणे आपल्या राष्ट्राध्यक्षास जेव्हा अभिषेक करण्यात आला तेव्हा बुद्धाची मूर्तीच सर्वात श्रेष्ठ मानण्यात आली.
हिंदू धर्म इतर धर्माहून कसा श्रेष्ठ आहे, याचे उत्तर हिंदू लोक देऊ शकतील काय ? अस्पृश्यांचे जीवन बरबाद करण्याची ताकद हिंदू धर्मात आहे, म्हणून हिंदू धर्म श्रेष्ठ म्हणावयाचा काय ? एखादा अस्पृश्य ब्राह्मणापेक्षा अधिक गुणसंपन्न असला तरी तो ब्राह्मणासमान होऊ शकत नाही, अशी शिकवण हिंदू धर्म देतो म्हणून तो श्रेष्ठ म्हणायचा काय ? एखाद्या अस्पृश्याने पवित्र | उद्गार काढले तर त्याची जीभ छाटली जावी, हे रास्त आहे काय ? अस्पृश्य मनुष्य गुरू होऊ शकत नाही म्हणून हिंदू धर्म श्रेष्ठ आहे काय ? तप्त शिसे अस्पृश्यांच्या कानात ओतावयास सांगणारा " हिंदू धर्म “ “धर्म “या संज्ञेस पात्रः आहे काय ?