२६७
बुद्धधर्मीय देशांनी धर्माच्या वाढीसाठी त्याग करावा
सिलोन बुद्धिस्ट काँग्रेस. ने सिलोनची जुनी राजधानी कॅण्डी येथे 'जागतिक बुद्ध परिषद' दिनांक २५ मे १९५० पासून आयोजित केली होती. ती ६ जून पर्यंत चालणार होती. त्यात आशिया व युरोपीय राष्ट्रांचे प्रतिनिधी प्रामुख्याने उपस्थित राहणार होते. सदर परिषदेत बुद्ध धर्माच्या शिकवणुकीनुसार जगात शांतता स्थापनेचा विचार करण्यात येणार होता. मुख्य प्रधान डी. एस. सेनानायके प्रतिनिधींचे कोलंबो रेसकोर्सवर स्वागत करणार होते. . य़ा परिषदेत भारत सरकारचे कायदे मंत्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रामुख्याने भाग घेणार होते
त्यानुसार दिनांक २३ मे १९५० रोजी जी डॉ. बाबासाहेब आंबेडकर हैद्राबाद मार्गे मद्रासला आले. ' डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वागतासाठी हजर असलेल्या अधिकारी, कार्यकर्ते, चाहते यात प्रामुख्याने कामराज नाडर यांचा संमावेश होता. "बुद्ध. धर्माबद्दल आस्था असल्यामुळे व मला परिषदेचे आमंत्रण असल्यामुळे मी. तिकडे जात आहे.” असे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पत्रकारांना सांगितले. . त्यानंतर ते कोलंबोकडे रवाना झाले.
आजपासून ६ वर्षानी बुद्ध युगास २,५०० वर्षे पुरी होणार असून त्यावेळी जगात बुद्धधर्माची जोरात लाट पसरलेली असेल असा आशावाद जागतिक बुद्ध भ्रांतृसंघाची स्थापना करण्याचा ठराव मांडताना सी. बी. नुगावाला या सिलोनी बुद्धप्रमुखाने कॅण्डी (सिलोन) येथे भरलेल्या परिषदेत व्यक्त केला. या ठरावास इंग्लंडच्या कु. कॉन्स्टन्स लाऊन्सबरी, ब्रह्मदेशचे यू चान चन, बंगालचे डॉ. अरविंद बरुआ, जपानचे रिरी नाकायमा, इटालीचे लोकनायक वं थायलंडचे सुखित निमहेंद्र यांनी पाठिंबा दिला.
दि. २६ मे १९५० रोजी येथील 'टेम्पल ऑफ दि ट्रुथ' नावाच्या मंदीरात २७ देशांचे बुद्धधर्मीय प्रतिनिधी जमले असून त्यांच्यामध्ये बुद्ध धर्माच्या पुनरुज्जीवनाविषयी चर्चा झाली. भारताचे कायदेमंत्री डॉ. बी. आर. आंबेडकर हे या प्रसंगी उपस्थित
दलित बंधु : २८ मे १९५०.