२६-५-१९५० बुद्धधर्मीय देशांनी धर्माच्या वाढीसाठी त्याग करावा - Page 245

बुद्धधर्मीय देशांनी धर्माच्या वाढीसाठी त्याग करावा २०५

असले तरी ते या परिषदेचे अधिकृत प्रतिनिधी नाहीत म्हणून अधिकृत चर्चेचे वेळी त्यांनी भाग घेतला नाही. जागतिक मैत्रीसंबंधीचा ठराव परिषदेने मंजूर केल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण झाले.

ते म्हणाले,

मी जरी या भ्रातृसंघाचा सभासद झालो नसलो तरी माझ्या भेटीचा उद्देश फार

खोल आहे. साऱ्या बुद्ध देशांनी केवळ भ्रातृसंघ न स्थापता बुद्धधर्माच्या प्रचारार्थ

त्याग करण्याची तयारी ठेवली पाहिजे. बुद्ध धर्माचे समारंभ भारतातील लोकांना

पाहावयास मिळावे व बुद्ध धर्माचा बाह्योपचारच केवळ पाळला जातो की खरा बुद्ध

धर्म आचरला जातो हे भारतीयांना समजावे अशी माझी इच्छा आहे. बुद्ध धर्म जागृत आहे की तो केवळ परंपरागत आहे हे पाहाण्याचाही आपला हेतू आहे.

त्यांनी आपल्या भाषणात केवळ जागतिक मित्रत्वासंबंधीच्या ठरावाबद्दल

असमाधान व्यक्त केले. बुद्धधर्मीय देशांनी त्या धर्माच्या वाढीचे कंकण बांधून

त्यासाठी त्याग केला पाहिजे, अशातऱहेची घोषणा या परिषदेत व्हायला हवी होती;

असा अभिप्राय त्यांनी व्यक्त केला.

डॉ. आंबेडकर म्हणाले की,

(१) “बुद्ध धर्माचे आचार नि उपचार भारतामध्ये पाहावयास मिळत नाहीत,

ते पाहाण्याची संधी साधावी;

(२) तसेच, मूळ तत्त्वांशी विसंगत अशा श्रद्धांनी बुद्धधर्मी लोक कितपत ग्रासले

आहेत व मूळ शुद्ध स्वरूपात तो धर्म कितपत राहिला आहे हे पहावे;

(३) आणि जग सिलोनला बुद्धधर्मा म्हणते म्हणून सिलोन बुद्धधर्मानुयायी आहे

3 की तो धर्म आजही जिवंत स्वरूपात येथे नांदत आहे याचा शोध घ्यावा;

ह्या त्रिविध उद्देशांनी मी या परिषदेला आलो. मित्रत्वाच्या ठरावाप्रमाणे मी

अधिकृत मित्र नसलो तरी येथे येण्यात माझा हेतू अधिक गंभीर स्वरूपाचा आहे.”