| २६८
बौद्ध धर्मातील अनेक तत्त्वे
हिंदू धर्माने आत्मसात केली
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वाय. एम. बी. ए. कोलंबोद्दारा आयोजित 'विश्व बौद्ध भ्रातृत्व सम्मेलनात ' दि. ६ जून १९५० रोजी भाषण केले. ते आपल्या भाषणात म्हणाले,
बंधु आणि भगिनींनो,
एखाद्या विषयाच्या परंपरेचे यथायोग्य ज्ञान झाल्यानंतरच त्याबद्दल यथार्थ ज्ञान होत असते. म्हणून ज्या परिस्थितीने बौद्ध धर्माला जन्म दिला ती आपण समजून घेतली तरच आपणाला बौद्ध धर्माचे वास्तविक महत्त्व कळू शकेल. भारताचा धर्म नेहमीसाठी हिंदू धर्म होता, हे मत मला मान्य नाही. हिंदू धर्म तर सर्वात शेवटी विचारांची उत्क्रांती होत असताना उदयास आला. वैदिक धर्माच्या प्रचारानंतर भारतात तीन वेळा धार्मिक परिवर्तन घडून आले आहे. वैदिक धर्माचे रुपांतर ब्राह्मण धर्मामध्ये झाले आणि ब्राह्मण धर्माचे रुपांतर हिंदू धर्मामध्ये झाले. बौद्ध धर्माचा समाजाचे विविध वर्णामध्ये विभाजन होण्यास विरोध होता. या चातुर्वर्ण्याची सुरुवात ब्राह्मण धर्माने केली होती. फ्रान्सकरिता फ्रान्सची राज्यक्रांती जेवढी महत्त्वाची आहे तितकाच मानव जातीसाठी बौद्ध धर्माचा उदयही महत्त्वाचा आहे.
वैदिक शिकवणीनुसार आचरण करणे सोपे आहे. वैदिक लोक मुख्यतः यज्ञपूजक. होते. वैदिक आर्यांची जवळजवळ तेहत्तीस कोटी आराध्य दैवते होती, असे सांगण्यात येते. ते आपल्या या देवतांना संतुष्ट करण्यासाठी यज्ञ करीत असत. या देवतांच्या पूजेसाठी गोळा करण्यात येणारी सामग्री अत्यंत श्रेष्ठ दर्जाची असणे आवश्यक होते. कृषि युगातील त्या आर्यांना गो-धन हे सर्वश्रेष्ठ धन वाटत होते. म्हणून ते आपल्या देवतांची पूजा गाईचा यज्ञात बळी देऊनच करीत असत. यामुळे वैदिक धर्म हा हिंसेला प्रोत्साहन देणारा
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भाषणे : संपादक-मा. फ. गांजरे, खंड-२.
पुनर्मुद्रण १०-४-१९८६, पृ. १७४-१७२९.