बौद्ध धर्मातील अनेक तत्त्वे हिंदू धर्माने आत्मसात केली २०७
ठरला होता. यज्ञामध्ये असंख्य पशुंचा बळी देण्यात येत होता आणि जे पशु यज्ञात बळी देण्यात येत असत त्यांना . स्वर्गप्राप्ती होते अशी याजकांची श्रद्धा होती. ''वैदिक हिंसा, हिंसा न भवति * अर्थात वैदिक यज्ञात झालेली हिंसा,
हिंसा नव्हे.
यज्ञामध्ये सर्रास प्राणीहत्येचा प्रचार होत असल्यामुळे ज्या ज्या प्राण्यांचे मांस खाण्यास योग्य होते अशा बकऱ्या, मेंढ्या, गाई यासारख्या प्राण्यांचा बहुधा यज्ञात बळी देण्यात येत असे. यज्ञाचा प्रचार वाढल्यामुळे पुरोहिताचे महत्त्व वाढले आणि ब्राह्मणवादाचा उदय झाला. या ब्राह्मणवादाने समाजाचे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र अशा चार वर्णामध्ये विभाजन केले. चार वर्णांची स्थापना करून समाजात विषमता निर्माण करणे ब्राह्मणवादाचा मुख्य हेतू होता. कारण त्याशिवाय ब्राह्मणांचे प्रभुत्व स्थापन करणे संभवनीय नव्हते. आपल्या श्रेष्ठत्वाच्या प्रस्थापनेसाठी ब्राह्मणांनी काही मंत्रांची रचना केली आणि त्या
मंत्रांद्वारे ते ब्राह्मणांची उत्पत्ती ब्रह्माच्या मुखातून, क्षत्रियांची बाहूतून, वैश्यांची मांड्यातून व शूद्रांची उत्पत्ती ब्रह्माच्या पायातून झाली, असा प्रचार करू लागले. यामुळे ब्राह्मण सर्व वर्णाचे गुरू व सर्वश्रेष्ठ आहेत, असे त्यांचे सांगणे होते. परंतु भगवान बुद्धानी याचे खंडन केले. ते म्हणतात, जशी सर्व माणसे उत्पन्न होतात तसेच ब्राह्मण होतात. ब्राह्मणांच्या स्त्रिया ऋतुमती होतात, गर्भवती होतात, नऊ मासपर्यंत गर्भपोषण करतात, प्रसूत होतात, मुलाला स्तनपान करतात, असेच सर्वत्र दिसून येते. अशा स्थितीत ब्राह्मण ब्रह्माच्या मुखातून निघाले व शूद्र त्याच्या पायापासून निघाले, असे ते म्हणू तरी कसे
शकतात ? जन्माने कोणीही शूद्र वा ब्राह्मण होत नाही. तर माणूस करणीमुळे
ब्राह्मण किंवा शूद्र ठरतो.
यापुढे भगवंत म्हणाले ' जटा, दाढी, गोत्र किंवा जन्मामुळे कोणीही ब्राह्मण
होत नाही. जो सत्यानुसार व धर्मानुसार आचरण करतो, जो काया-वाचा-मनाने
कोणतेही पाप करीत नाही, जो काम-क्रोधरहित आहे ; जो व्रती, शीलवान,
अनुत्सुक, दान्त आणि जितेन्द्रिय आहे ; जो तृष्णारहित व संशयरहित आहे ; जो
राग-द्वेष मदविहीन आहे : जो शोकरहित, निर्मल व शुद्ध आहे ; ज्याने भवचक्रात
लोटण्यास कारणीभूत होणाऱ्या मोहाचा त्याग केला आहे, ज्याने रती व अरतीचा
त्याग केलेला असून त्यामुळे जो शांतचित्त आहे ; जो गंभीर, प्रज्ञावंत, मेधावी,
मार्म-अमार्गाचा ज्ञाता आहे आणि जो सर्वोत्तम अशा निर्वाणाचा अधिकारी आहे,
त्यालाच मी ब्राह्मण म्हणू शकतो. "
रि वि (वाय) ४११--१५-अ