बौद्ध धर्मातील अनेक तत्त्वे हिंदू धर्माने आत्मसात केली २०९
वाजवीपेक्षा जास्त सहनशील होता. यामुळे मी त्याला दोष देत आहे. सम्राट अशोकाने आपल्या कारकीर्दीत बौद्धधर्माशिवाय अशा अनेक धर्मांना प्रचाराची मुभा देऊन ठेवली होती की जे बौद्ध धर्माचे कट्टर दुष्मन होते. यामुळे बौद्ध धर्माच्या विरूद्ध असणाऱ्या अधर्मांना आपली शक्ती वाढविण्याची पुरेपूर संधी प्राप्त झाली व हाच बौद्ध धर्माला पहिला आघात होय, असे मला वाटते.
बौद्ध ग्रंथांवरून दिसून येते की, भगवान बुद्धाच्या श्रमण शिष्यांमध्ये जवळ जवळ शेकडा ६० ब्राह्मण होते. ब्राह्मण लोक भगवान बुद्धाशी वादविवाद करण्यासाठी त्यांच्याकडे येत असत व वादविवादात निरुत्तर झाल्यामुळे प्रभावित होऊन सहर्ष त्यांच्या धर्माची दीक्षा घेऊन भगवान बुद्धाबद्दल श्रद्धा बाळगीत असत. या श्रमण शिष्यांमुळे भगवान बुद्धाचा व त्यांच्या धर्माचा प्रभाव . दिवसेंदिवस वाढत होता. परंतु बौद्ध धर्मात जातीभेद नसल्यामुळे क्रमशः जेव्हा खालच्या जातीतील लोक बुद्धाला शरणागत होऊन सिद्ध भिक्षु बनू लागले व घनिकांद्वारा व राजांद्वारा त्यांची पूजा व सत्कार होऊ लागला तेव्हा ही गोष्ट ब्राह्मणांना सहन झाली नाही व ते बौद्ध धर्माचा उच्छेद करण्याच्या मार्गाला लागले.
` भारतात प्राचीन काळापासून ज्याप्रमाणे ग्राम-देवता, प्रदेश-देवता, वन-देवी, नद-नदी-देवी इत्यादी देवता होत्या व त्यांची पूजा होत होती, त्याप्रमाणेच कुलदेवताही होत्या. राजेलोक व धनिकांच्या कुलदेवतांची पूजा बहुधा ब्राह्मणांद्वारा होत असे. त्यामुळे राजमहालामध्ये कुलदेवतेच्या पूजेसाठी जाणारे ब्राह्मण राणीच्या मध्यस्थीने राज्य शासनावर आपला प्रभाव चालवीत असत. या प्रभावाचा उपयोग करून त्यांच्या निरंतर वर्चस्वाला बाधक होणाऱ्या बौद्ध धर्माची पाळेगुळे खणून काढण्याचा ते प्रयत्न करीत. सम्राट अशोकाच्या काळात या कुलदेवतापूजेची निदा करण्यात आली. अशोक म्हणतो : “* मी बौद्ध धर्माच्या मार्गाचे अनुसरण करीत असल्यामुळे मला दुसऱ्या कोणत्याही देवी देवतांची पूजा करण्याची गरज नाही. “ आणि त्याने आपल्या प्रशासनाधिकाऱ्यांना आदेश देऊन कुलदेवतांच्या मूर्ती काढून टाकल्या. हा ब्राह्मणांवर फार मोठा प्रहार होता. कारण यामुळे त्यांच्या उपजिविकेला व धूर्त प्रचाराला फार मोठा धक्का बसला आणि ते त्याचा बदला घेण्यास सिद्ध झाले. ब्राह्मण पुरोहितांची पूर्वी अशी धारणा होती की सर्व राजेलोक मेल्यानंतर नरकात जातात. कारण राज्य शासन चालविताना त्यांना पुष्कळशी पापकृत्ये करावी लागतात. यामुळे तशी संधी प्राप्त झाली तरीही ब्राह्मण लोक राज्यभार. आपल्या शिरावर घेण्यास तयार नव्हते. मात्र राजसिंहासनावर बसण्यास ते तयार नसले तरी मंत्री किवा पुरोहित म्हणून राजाला सल्ला देण्याचे कार्य करीत असत. त्याचप्रमाणे कायदे