६-६-१९५० बौद्ध धर्मातील अनेक तत्त्वे हिंदू धर्माने आत्मसात केली - Page 251

बौद्ध धर्मातील अनेक तत्त्वे हिंदू धर्माने आत्मसात केली २११

.उदय झाला व बौद्ध साहित्य सुधारित संस्कृतमध्ये लिहिल्या जाऊ लागले. विदेशी आक्रमकांपैकी मुसलमानांद्वारा बौद्ध धर्माला अधिक झळ पोहोचली. मुसलमान लोक प्रतिमा व मूर्तीचे विरोधी होते. त्यांनी बुद्धाच्या मूर्तीची फोडतोड केली व मिक्षूंना ठार मारले. त्यांनी नालंदाच्या विशाल बौद्ध विश्‍वविद्यालयाला सैनिकी किल्ला समजून व चीवरधारी भिक्षुंना सैनिक समजून त्यांचा संहार केला. जे भिक्षु त्या भीषण रक्‍तपातातून वाचले ते नेपाळ, तिबेट, चीन इत्यादि देशात पळून गेले.

नालंदा येथील विशाल ग्रंथालयात ताडपत्र व भोजपत्रावर लिहिलेले सुमारे दोन लाख ग्रंथ होते ; व त्यात हजारो वर्षाचे ज्ञान साठविलेले होते. त्यांना बख्तियार खिलजीने आग लावून दिली आणि तेथे शिकत असलेल्या सहा हजार विद्यार्थ्यापिकी काहींना ठार मारले व काहींना जबरदस्तीने मुसलमान करून सोडले. मुसलमानी आक्रमक जेथे जेथे गेले तेथे तेथे त्यांनी बौद्धांना ठार तरी मारले किंवा मुसलमान तरी बनविले आणि बौद्ध मूर्तीची फोडतोड केली, ग्रंथालये जाळली व विहार नष्ट केले. माझे काही हिंदू मित्र मला विचारतात की मुसलमान आक्रमकांनी हिंदू मूर्ती व हिंदू मंदिरांचीही नासधूस केली आहे ना? यावर माझे उत्तर असे की, जितकी बौद्ध धर्माची नासधूस त्यांनी केली तितकी हिंदू धर्माची केली नाही. याचे कारण असे की, बहुधा सर्वच ब्राह्मण गृहस्थ होते आणि ते आपल्या परिवारासह आपल्या घरीच राहात असल्यामुळे त्यांना ओळखण्याची वेगळी अशी खूण नव्हती. परंतु बौद्ध भिक्षु मात्र कुटुंबविरहित, चीवरधारी आणि विहारात राहात असत आणि त्यांना सहज

ओळखता येत होते. त्यामुळे हिंदुंची प्रसिद्ध मंदिरे जरी मुसलमानांनी फोडली

असली तरी त्यांच्या धर्मगुरुंना व पुरोहितांना हानी पोहोचली नाही.

कोणताही धर्म जिवंत राहण्यासाठी त्यातील धर्मगुरु व पुरोहित कायम

राहणे आवश्यक असते. बौद्ध धर्माचा लोप होण्याचे विशेष कारण म्हणजे

बौद्धभिक्षुंचा अभाव निर्माण झाला होता. . बौद्ध भिक्षुंची कोणतीही जात

नव्हती. कोणीही व्यक्ती बौद्ध धर्माला शरण जाऊन उपासक, श्रामनेर,

भिक्षु किंवा स्थविर-महास्थविर होऊ शकत होता. भिक्षु लोक समाजापासून दूर

विहारात राहात असत. ब्राह्मणवादामध्ये ही बाब नव्हती. ' तेथे केवळ

ब्राह्मणांच्या घरी जन्म होण्यामुळेच नवीन ब्राह्मण्य निर्माण होत असे. या

कारणामुळे हिंदुंची विशेष हानी झाली नाही. नंतरच्या काळात मागासवर्गीय

लोकांना भिक्षु बनवून बौद्धांची परंपरा कायम राखण्याचा प्रयत्न करण्यात आला