२१२ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
परंतु चांगल्याप्रकारे शिक्षित नसल्यामुळे हे भिक्षु ब्राह्मणांच्या युक्तिवादाला उत्तर देऊ शकले नाहीत व त्यामुळे त्यांची हार झाली.
दरम्यानच्या काळात शैव योग्यांनी शैव धर्माचा व ब्राह्मणांनी वैष्णव धर्माचा प्रचार केला. वैष्णव आणि शैवामध्ये जोरदार संघर्ष झाला. शेवटी ब्राह्मणांनी शैवांना ' रुद्र ' बनवून आपणामध्ये सामील करून घेतले व शैव आणि वैष्णव यांचे ऐक्य झाले. सध्याच्या काळात हिंदू धर्म पुष्कळच परिवर्तित झाला आहे. पूर्वी तो हिंसेची शिकवण देत होता परंतु आता तो अहिंसेची शिकवण देतो. बौद्ध धर्मातील अनेक तत्त्वे हिंदू धर्माने आत्मसात केली. प्रतिमा, चैत्य, विहार आणि भिक्षु इत्यादी दृष्टीने आज भारताला बौद्ध धर्म नसला तरी तात्विक रूपाने अजूनही तो भारतभर पसरलेला आहे.