२१-७-१९५० संघटनेनेच राजकीय शक्ती प्राप्त होणार आहे - Page 262

डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे २२२

ते कोणी हिरावून घेतले तर त्या सरकारच्याविरूद्ध दाद मागण्यासाठी राष्ट्राचे जे सुप्रीम कोर्ट आहे तिकडे जाता येते. तेव्हा घाबरण्याचे कारण नाही. एकीने वागा, हेच आज तुम्हास सांगावयाचे आहे.

२,००१ रुपयांची थैली बाबासाहेबांनी श्री. सुबय्यासाहेब यांना आगामी निवडणुकीसाठी खर्च करण्याकरिता दिली व शेवटी जयघोषात सभा संपली,