२७३
वकिलीच्या व्यवसायात नीतीमत्ता राखली पाहिजे
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे औरंगाबाद येथे ता. २१ जुलै १९५० रोजी . दुपारी येऊन दाखल झाले. स्टेशनवर त्यांच्या स्वागताकरिता तालुकेदार श्री. गोविंदराव देशपांडे, पोलीस सुपरिटेंडेंट श्री. हरिश्चंद्र, इतर अधिकारी, स्थानिक पुढारी, वकील व शे. का. फेडरेशनचे हजारो लोक उपस्थित होते.
गार्ड ऑफ ऑनर
हार अर्पण करण्यात आल्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर खाली उतरले व स्थानिक पोलीस दलाची सलामी स्वीकारून गार्ड ऑफ ऑनरची पाहाणी केली. त्यानंतर त्यांना अनेक घोषणांच्या निनादात शे.का.फे. च्या लोकांनी हार अर्पण केले. |
यानंतर डॉ. आंबेडकर हे प्रिन्सिपाल चिटणीस व श्री. चित्रे यांच्यासह पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या इमारतीकडे रवाना झाले व पाहाणी करून सलूनमध्ये परत आले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कॉलेजच्या समारंभाला उपस्थित राहून कॉलेजच्या नवीन इमारत बांधण्याच्या जागेची पाहाणी केली. इमारतीची कोनशिला बसविण्याचा समारंभ डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्या हस्ते होणार आहे.
कोर्टाला भेट
ता. २३ रोजी त्यांनी नवीन कॉलेजची जागा पाहिल्यावर येथील सेशन्स कोर्टाला भेट दिली. सेशन्स कोर्टाचे जज्ज श्री. चंद्रकांत गोडसे यांनी त्यांचे स्वागत करून त्यांनी कोर्ट व बार असोसिएशन फिरून दाखविले.
यानंतर डॉ. साहेबासंबंधी बोलताना डॉ. आंबेडकर हे आधुनिक मनू आहेत, असे उदगार गोडसे जज्जनी काढले. यानंतर डॉक्टरसाहेबांनी मुनसिफ
` कोर्टातील उर्दूमधून चालणारे कामकाज ऐकले. या कामकाजाला उद्देशून
` डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले,
उर्दूमधील कामकाज मला कळले नाही तरी ते समाधानकारक असले पाहिजे
असे माझे मत बनले आहे.
जनता : २९ जुलै १९५०.