१-१२-१९५० भारतीय घटनेच्या मार्गदर्शक तत्त्वावर आधारित सर्वांसाठी मुलकी कोड हवा - Page 266

२७५
भारतीय घटनेच्या मार्गदर्शक तत्त्वावर आधारित
सर्वासाठी मुलकी कोड हवा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर दिनांक १ डिसेंबर १९५० रोजी श्री. दास यांच्या

प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले,

लोकसभेत ठेवण्यासाठी मुस्लिम कोड बिल तयार करण्याचा सरकारचा विचार चालू नाही. सर्वांना लागू होईल, असे भारतीय घटनेच्या मार्गदर्शक तत्त्वावर (डायरेक्टिव प्रिन्सिपल्स) आधारलेले मुलकी कोड तयार करावे अशी माझी फार फार इच्छा आहे. पण मला तेवढा वेळच मिळत नाही.

जनता : २ डिसेंबर १९५०.