१४-१-१९५१ बौद्ध धर्म हा पुन्हा या देशाचा धर्म होईल - Page 267

२७६
बौद्ध धर्म हा पुन्हा या देशाचा धर्म होईल

डं bd "ह प्ण >. ' अकळ ह ' वरळी, मुंबई येथील बुद्धदूत सोसायटीच्या विद्यमाने भरविण्यात आलेल्या अेळ्यास मध्यवर्ती सरकारचे कायदेमंत्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी रविवार शारीख १४ जानेवारी १९५१ रोजी सायंकाळी ६ वाजता भेट दिली.

, दर्शनोच्छुक समाज संध्याकाळी ४ वाजल्यापासून सभामंडपात व भोवताली सापडेल त्या जागेवर गर्दी करून उभा होता. अखेरिस बरोबर ६ वाजता

बाबासाहेब सभामंडपात आले आणि " बाबासाहेबांच्या जयजयकाराने ' भोवतालचा

विभाग गरजला. पुष्पमालिकांनी स्वागत केल्यानंतर प्रो. भागवत जमलेल्या ६ हजार जनसमुदायास उद्देशून म्हणाले, " बुद्धाबद्दल आणि त्यांनी जगास

दिलेल्या अद्वितीय धर्माबद्दल एकंदर जनतेस माहिती व्हावी या हेतूने हा बुद्धमेळा

भरविण्यात आला आहे. चार महिन्याच्या अगोदर हा विहार अपुरा बांधलेला होता

व लवकरच हे बांधकाम सुरू करता येईल की नाही याबद्दल आमचा आम्हाला

भरवसाही नव्हता ! पण बाबासाहेबांनी ४ महिन्यांपूर्वीच विहारास भेट दिली

आणि काय आश्‍चर्य ! इतके दिवस पडून असलेले बांधकाम सुरू झाले. आणि

आता ते पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. हा फक्त बाबासाहेबांच्या आशिर्वादाचा

प्रभाव आहे. काही काही माणसाचा प्रभावही असा असतो. त्यांनी हातात माती

धेतली तर तिचे सोने होते, जी काही कामे बाबासाहेबांनी हातात घेतली ती

सर्व कामे सर्वांगसुंदर वठली आहेत. उदाहरणार्थ सिद्धार्थ कॉलेज इत्यादी.”

गौतम बुद्धाबद्दल बाबासाहेब एक पुस्तक लिहित असल्याचेही त्यांनी सांगितले.

बरोबर ६.१० ला बाबासाहेब भाषण करायला उठल्याबरोबर टाळ्यांचा

अतिप्रचंड कडकडाट झाला व पुनश्च जयघोषाने वातावरण बराच वेळ दुमदुमून

मेले, बाबासाहेब म्हणाले,

प्रिय भगिनींनो आणि बंधुजनहो,

मी या ठिकाणी उपस्थित झालो आहे तो तुमच्यापुढे व्याख्यान देण्याकरिता

नव्हे. मला वाटले हा मेळा संपलासुद्धा असेल, पण काल माझे मित्र प्रो. भागवत

मला भेटले व त्यांनी सांगितले की मेळा पुष्कळ दिवस चालणार आहे. मला

इथे येण्याइतका वेळ नव्हता; पण लोकांच्या आग्रहामुळे मला नाही म्हणता आले

नाही आणि मी हजर झालो. अशा समारंभाला हजर राहाण्याचे परिणाम काय

जनता : २० जानेवारी १९५१.