१५-४-१९५१ अस्पृश्य समाजावर होणाऱ्या जुलमांना दलित प्रतिनिधींनी वाचा फोडली पाहिजे - Page 272

२३२ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

पूर्वी मध्यवर्ती सरकारच्या कचेरीत एकही दलित वर्गातील माणूस नव्हता. अस्पृश्याला पट्टेवाला सुद्धा होता येत नसे. त्यानंतर आपल्या प्रयत्नांना यश येऊन नोकऱ्यांमध्ये दलित वर्गासाठी प्रमाण ठरविण्यात आले. त्यांच्या शिक्षणासाठी सालीना तीन लाख रुपये मंजूर करण्यात आले.

भवनाला आपले नाव देण्याच्या कल्पनेबद्दल डॉ. आंबेडकरांनी नापसंती व्यक्त केली. नाव बदलले तर आपल्याला फार आनंद होईल असेही त्यांनी आपल्या भाषणात सांगितले.