२०-५-१९५१ बुद्धाने वर्णाश्रम धर्म नाकारला - Page 274

आणि भाषणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन २३४

मोठी बाब नाही. कारण बुद्ध जयंती साजरी करणे ही काही फार

परंतु आपण बुद्ध थोरामोठ्यांच्या कर्तबगारीबद्दल आदर बाळगणे योग्यच असते.

जयंती साजरी करतो ती एवढ्याचसाठी की, भारतातील सामाजिक अधःपतन नाहिसे व्हावे. म्हणून बुद्धाच्या शिकवणुकीचा अंगीकार करण्यास लोकांना सांगण्यापूर्वी बौद्ध धर्म आणि हिंदू धर्म यातील फरक नीट समजावून सांगायला हवा. चातुर्वर्ण्य, मूर्तिपूजा व आध्यात्मिक तत्त्वे या स्वरूपात सामाजिक भेदभावावर हिंदू धर्म आधारलेला आहे. लोकांच्या सामाजिक अधःपातास व राष्ट्राच्या नहासास कारणीभूत झालेल्या ब्राह्मणशाहीत व सध्याच्या हिंदू धर्मात मला तरी काहीच फरक दिसत नाही. हिंदू धर्मात शांती, एकी नाही आणि याचे कारण चातुर्वर्ण्यावर आधारभूत झालेली हिंदू धर्माची इमारत, ही गोष्ट आज बहुतेक हिंदू मान्य करीत आहेत. परंतु ही चातुर्वर्ण्याची चौकट मोडायची कशी, हिंदू धर्मात शांती आणि एकीची प्रस्थापना करायची कशी, हा मार्ग कुणीच जाणत नाही. योग्य-अयोग्याचा विचार करून अयोग्याचा त्याग न करण्यास कारण एकच की, या अयोग्यामुळे-चातुर्वर्ण्यामुळे हिंदुंचा दर्शनी फायदा होतो.

मला सर्व हिंदुंना हेच सांगायचे आहे की, त्यांनी ही वर्णाश्रमपद्धती झुगारून जुन्या कोत्या समजुती समूळ उडवून टाकल्या पाहिजेत. पण हे व्हावं कसं ? कारण ते वेदाची आज्ञा प्रमाण मानतात आणि वेदात ही वर्णाश्रम पद्धती उचलून धरण्यात आली आहे. धर्म सुधारला पाहिजे, अशी नुसती भाषा बोलून भागायचं नाही. त्याकरिता आचार-विचारातील आमूलाग्र फरक प्रत्यक्षात उतरला पाहिजे. त्याशिवाय सुधारणेची आशाच करावयाला नको.

_ बुद्ध धर्माचा द्वेष करणाऱ्या ब्राह्मणांना मला असे विचारायचे आहे की, बुद्धाला

सुरवातीला जे भिक्खू शिष्य मिळाले ते कोण होते ? यातील शेकडा नव्वद टक्के

ब्राह्मण होते. काही हिंदुंचे म्हणणे असे की, बुद्ध धर्माचा स्वीकार करावयाचा

असला तर करावा पण असे करताना ब्राह्मणशाहीला शिव्या का ? याचे उत्तर

सोपे आहे. वर्णाश्रमावर आधारभूत असलेल्या ब्राह्मणशाहीवर, हिंदू धर्मावर प्रहार केला नाही, त्याचे खरे स्वरूप उघड केले नाही तर बुद्ध धर्माच्या प्रसारात, प्रगतीच्या मार्गात ती एक मोठी धोंड होऊन बसेल. स्वच्छ पाणी आणि घाण

पाणी या दोन प्रवाहांना एकत्र वाहू दिले तर स्वच्छ पाणी घाण होऊन

जाईल. तद्वत बौद्ध धर्माच्या शुद्ध तत्त्वाच्या बरोबरच हिंदू धर्माचे घाण पाणी वाहू

देता कामा नये.

बुद्ध धर्माप्रमाणे हिंदू धर्मातही अहिंसेवर भर देण्यात आला आहे ही गोष्ट खरी, परंतु वर्णाश्रम पद्धती हा हिंदू धर्माचा पाया बनविला गेल्यामुळे ती एकच बाब