१-९-१९५१ आमच्या सर्व सामाजिक दुखण्यांवर उच्च शिक्षण हेच औषध - Page 279

आमच्या सर्व सामाजिक . . . . हेच औषध २३९

जरी एक वर्षे झाले असले तरी कॉलेजला एक सुन्दर लायब्ररी आहे. तीत कॉलेजला लागणारी सर्व प्रकारची पुस्तके आहेत. सोसायटीने या लायब्ररीकरिता चाळीस हजार रुपये खर्च केले असून एक वर्षाच्या आतच चार हजार पुस्तकांचा | संग्रह केला; वाड्मयीन आणि चौसष्ठ विषयावरील मासिके येथे येत असतात. कॉलेज विद्यार्थी आणि संशोधन करणारे विद्यार्थी या दोघांनाही उपयुक्त होईल अशी ही लायब्ररी व्हावी अशी सोसायटीची इच्छा आहे.

विद्यार्थ्यांचा शारीरिक विकास होण्यासाठी खेळ आणि व्यायाम याकडे खास लक्ष पुरविले जाते. मुलांच्या शास्त्रीय आणि बौद्धिक विकासाकडेही लक्ष दिले जाते. विद्यार्थ्यांत शास्त्रीय विषयांची आवड निर्माण करण्यासाठी तांत्रिक, औद्योगिक आणि संशोधन स्थळांच्या सफरी करण्यात येतात. वादविवाद, बाङ्मय आणि सायन्स अशी मंडळे स्थापन करण्यात आली आहेत आणि या सर्वांचा फ़ायदा पुष्कळ विद्यार्थी घेत आहेत.

केवळ विद्यार्थ्यांनाच नव्हे तर सर्वसाधारण जनतेलाही कॉलेजने शिक्षण देण्याचा प्रयत्न केला आहे. या दिशेने ' अन्नधान्य आणि जनता ' या युनेस्कोने सुचविलेल्या विषयावर व्याख्यानमाला ठेवण्यात आली होती. ही व्याख्यानमाला फारच लोकप्रिय झाली आणि वर्तमानपत्रांनी तिचे स्वागत केले. कॉलेज आणि

जनता यांच्यातील हा परस्परसंबंध असाच टिकविण्याचा कॉलेज प्रयत्न करील.

प्राथमिक अवस्थेत असलेले हे कॉलेज कोणत्याही बाबतीत मागे नाही. किंबहुना

कॉलेजच्या प्रत्येक बाबतीत जिवंतपणा असून ते मोठ्या जोमाने वाढत आहे.

लोकांच्या डोळ्यात भरण्यासारखे कॉलेजने जे काही मिळविलेले असेल त्याचे सर्व श्रेय केवळ कॉलेजलाच जावे असे मी म्हणत नाही. तर त्याचे इतरही वाटेकरी आहेत आणि याकरता सोसायटी सर्वाची ऋणी आहे, हे मी

जाहीर करतो. या यशाच्या वाटेकऱ्यात जे माझे मित्र आहेत त्यात हैद्राबादचे

माजी शिक्षण मंत्री श्री. राजा धोंडी राज बहादुर हे आहेत. त्यांच्या मदती-

शिवाय कॉलेज सुरू करणेच शक्‍य झाले नसते. तद्नंतर हल्लीचे मुख्य प्रधान

श्री. एम. के. वेलोदी, अर्थमंत्री श्री. सी. व्ही. एस. राव, महसूल मंत्री श्री. शेषाद्री,

शिक्षण मंत्री श्री. रामकृष्ण राव, त्याचप्रमाणे माझे सहकारी मित्र श्री. गोपालस्वामी

अय्यंगार, मिनिस्टर फॉर स्टेट, उस्मानिया युनिव्हर्सिटीचे व्हाईस चॅन्सेलर नवाब

अल्लीयावर जंगबहादूर, हैद्राबाद शेड्यूल्ड कास्ट ट्रस्ट फंडाचे सेक्रेटरी

श्री. आबासे, औरंगाबादचे त्यावेळचे कलेक्टर श्री. राजवाडे, लँड अँक्विझिशन

ऑफिसर श्री. अष्टपुत्रे, हैद्राबाद स्टेट काँग्रेसचे अध्यक्ष श्री. बिंदू, पी. डब्ल्यु. डी.

मंत्री श्री. नबाबजंग यावरजंग, पी. डब्ल्यु. डी. चे आर्किटेक्ट दवे या सर्वांचे