आमच्या सर्व सामाजिक . . . . हेच औषध २४१
उघडण्यापूर्वीपासूनच उस्मानिया युनिव्हर्सिटीचे हे कॉलेज येथे अस्तित्त्वात आहे
हे खरेच आहे. पण दोन्ही कॉलेजे सुरळीत चालण्याएवढी विद्यार्थ्यांची संख्या
या ठिकाणी नसल्यामुळे ते कॉलेज सोसायटीच्या कॉलेजशी प्रतिस्पर्ध्याप्रमाणे
वागत आहे. संस्थानात अशी अनेक शहरे आहेत कौ, ज्या ठिकाणी इमारतीची
सोय आहे, पण कॉलेज नाही. संस्थानी प्रजेच्या आणि आपल्या स्वत:च्या
फायद्याच्या दृष्टीने, अशाच एखाद्या शहरात आपले कॉलेज नेणे उस्मानिया
युनिव्हर्सिटीला सहज सोपे होईल. उस्मानिया युनिव्हर्सिटी आपले कॉलेज .
औरंगाबादहून संस्थानातील दुसऱ्या एखाद्या शहरी नेईल असे सोसायटीला
सांगण्यात आले होते. हे करण्याऐवजी औरंगाबादेतच कॉलेज ठेवण्याचा
उस्मानिया युनिव्हर्सिटीचा प्रयत्न चालू आहे. युनिव्हर्सिटीच्या सर्व विद्यार्थ्यांची
सोसायटीचे कॉलेज आपल्यात सोय करू शकेल, यासाठी कॉलेजमध्ये जरूर ती
तरतूद आहे. या उलट उस्मानिया युनिव्हर्सिटीच्या कॉलेजच्या जागेच्या बाबतीत एवढी कठीण स्थिती आहे की ते आपल्या प्रयोगशाळा (लेबोरेटरी) कालेअरक (औरंगाबादेतील निजाम सरकारचा जुना राजवाडा) या इमारतीत हलवीत आहे. असे समजते की या कामासाठी १०,००० रुपये मंजूर करण्यात आले आहेत. पण कॉलेजला योग्य अशा सरकारी इमारती असलेल्या मराठवाडा भागातील मोमिनाबाद शहरीच कॉलेज आणि लेबोरेटरीज नेणे योग्य होणार नाही का ? असे केल्यास दुसऱ्या एका जिल्ह्याला उच्च शिक्षणाची संधी मिळेल आणि सोसायटीचे कॉलेजही निरर्थक चढाओढीतून मुक्त होईल.
दुसरी अडचण फी संबंधीची आहे. उस्मानिया युनिव्हर्सिटीला आपल्या
अधिकारात कॉलेजची प्रवेश फी ठरविण्याचा हक्क आहे. उस्मानिया युनिव्हर्सिटीत वर्षाची ६० रुपये म्हणजे अगदी कमीत कमी समजली जाणारी फी ठरलेली
आहे. पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या कॉलेजला वर्षाची १२० रुपये फी घेण्याची उस्मानिया युनिव्हर्सिटीकडून परवानगी देण्यात आली आहे, हे खरे
आहे. तरी सुद्धा लगतच्याच नाशिक आणि खानदेश या मुंबई युनिव्हर्सिटीच्या
जिल्ह्यातील कॉलेजात घेण्यात येणाऱ्या फीशी तुलना केल्यास ही फी फारच कमी
आहे. फी च्या या कमी प्रमाणाला संस्थानातील प्रजेच्या आर्थिक स्थितीशी काही
कर्तव्य नाही. त्याचा आर्थिक दर्जा कोणत्याही तऱ्हेने जवळच्या संस्थानातील
प्रजेच्या आर्थिक दर्जाहून कमी नाही.
उत्पन्नाचा एक मार्ग म्हणून युनिव्हर्सिटी फीकडे पाहात नसल्याने युनिव्हर्सिटीला एवढी कमी फी ठेवणे परवडते. पूर्वीच्या कराराप्रमाणे (चार्टर) हैद्राबाद सरकार युनिव्हर्सिटीचे सर्व प्रकारचे उत्पन्न म्हणजे सरकारी महसूल समजे. युनिव्हर्सिटी केवळ वसूल करणारी एजंट. तिला उत्पन्नाशी काही कर्तव्य नव्हते. युनिव्हर्सिटीची प्राप्ती म्हणजे सरकारकडून मिळणारी वार्षिक ग्रँट.