२४२ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
तिसऱ्या कारणाचा संबंध प्राध्यापकांच्या पगाराच्या प्रमाणाशी येतो. उस्मानिया युनिव्हर्सिटीला आपल्या अधिकारात खाजगी कॉलेजमधील प्राध्यापक वर्गाचे पगाराचे प्रमाण ठरवून देण्याचा हक्क आहे. औरंगाबादमधील उस्मानिया युनिव्हर्सिटीच्या कॉलेजातील प्राध्यापक वर्गाच्या पगाराचे प्रमाण खालीलप्रमाणे
आहे,
हुद्दा पगार रुपये
प्रिन्सिपाल १,२००-१,७००
प्रोफेसर ८००-१,५००
लेक्चरर ३००-८००
रीडर ३५०-८००
औरंगाबादमधील पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या कॉलेजसाठी युनिव्हर्सिटीने ठरवून दिलेले पगाराचे प्रमाण खालीलप्रमाणे आहे,
हुद्दा पगार रुपये
प्रिन्सिपाल ५००-७००
लेक्चरर __ २५०-४००
ज्युनियर लेक्चरर १८०-३२५
उस्मानिया युनिव्हर्सिटीच्या कॉलेजांमधील प्राध्यापकांच्या पगाराचे प्रमाण निःसंशय फारच जास्त आहे. उस्मानिया युनिव्हर्सिटीने सोसायटीच्या कॉलिजसाठी ठरवून दिलेले पगाराचे प्रमाण हे सोसायटीने स्वतःच्या कॉलेजसाठी ठरविलेल्या प्रमाणापेक्षा काहीसे कमी आहे, हे खरे आहे पण शेजारच्या नाशिक आणि खामदेश जिल्ह्यातील कॉलेजच्या फी तील फरक आणि तेथील पगाराचे प्रमाण याच्याशी तुलना केल्यास हे प्रमाण अतिशय जास्त आहे आणि ते कॉलेजच्या आर्थिक स्थितीवर जड ओझेच होऊन बसते.
चौथे कारण सरकारी ग्रँट संबंधीचे. हैद्राबाद संस्थानातील कॉलेज शिक्षण म्हणजे उस्मानिया युनिव्हर्सिटीची मक्तेदारीच होऊन बसली आहे. उच्च शिक्षणाबाबतच्या सर्व प्रकारच्या जबाबदारीपासून आपण स्वतः वेगळे राहून हैद्राबाद सरकारने ती कामगिरी उस्मानिया युनिव्हर्सिटीकडे सोपविली आहे. सरकारची जबाबदारी म्हणजे संस्थानातील कॉलेज शिक्षणासाठी उस्मानिया युनिव्हर्सिटीला फक्त वार्षिक ग्रँट देणे ही होय. याच रकमेतून आपल्या कॉलेजला गट मिळेल अशी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची अपेक्षा होती.