१-९-१९५१ आमच्या सर्व सामाजिक दुखण्यांवर उच्च शिक्षण हेच औषध - Page 283

आमच्या सर्व सामाजिक . . . . हेच औषध २४३ पण घटक कॉलेजचा योगक्षेम चालविणे एवढीच आपली जबाबदारी असून संलग्न, युनिव्हर्सिटीला जोडलेल्या कॉलेजचा ग्रँटवर काहीच हक्क नाही, असा उस्मानिया युनिव्हर्सिटीचा युक्तिवाद आहे. याच कारणास्तव सोसायटीचे कॉलेज हे युनिव्हर्सिटीला जोडण्यात आलेले असल्यामुळे त्याला उस्मानिया युनिव्हर्सिटीकडून मदत, ग्रँट नाकारण्यात आली. उलट सरकारचे म्हणणे असे आहे की जेवढी ग्रँट देण्यास आपण बांधलेले आहोत तेवढी ग्रँट आपण उस्मानिया युनिव्हर्सिटीला दिली आहे. म्हणून सोसायटीच्या कॉलेजच्या ग्रँटची जबाबदारी आपल्यावर नाही आणि आपण अधिक काही करू शकत नाही. याचा परिणाम असा झाला आहे की सर्व प्रकारच्या वार्षिक तुटीचा बोजा सोसायटीला सहन करणे भाग पडत आहे.

ही कारणे परिणामी घातक असून कॉलेजपुढे मोठी कठीण समस्या निर्माण झाली आहे. सर्व बाजूंनी कॉलेज अशा अडचणीत सापडले असून त्या दूर करण्यास ते असमर्थ आहे. कॉलेजला वार्षिक ग्रँट नाकारण्यात आल्यामुळे, फी च्या अल्प प्रमाणामुळे आणि प्रतिस्पर्धी कॉलेजमुळे आर्थिक स्थितीवर प्रतिकूल

परिणाम होत आहे. पगाराच्या असमर्थ नि भारी प्रमाणामुळे (8०818) खर्चाची बाजू वाजवीपेक्षा जड झाली आहे.

कॉलेजचे भवितव्य पूर्णपणे या अडचणीच्या निरसनावर अवलंबून आहे आणि उस्मानिया युनिव्हर्सिटी व संस्थानी सरकार यांच्या जोड प्रयत्नांनी त्या दूर केल्या जाऊन कॉलेजचे भवितव्य सुरक्षित आणि निर्भय केले जाईल अशी मला उमेद आहे. सोसायटीला काही खास सवलत (558९०७) नको. जे काही पाहिजे आहे ते कार्यासाठी चांगले आणि मोकळे क्षेत्र !

मला अधिकृत अशी काही माहिती नाही, पण मी असे ऐकतो की आमच्या सोसायटीच्या कॉलेजला काही वार्षिक ग्रँट देण्याचे हैद्राबाद सरकारने ठरविले आहे. ही मोठी अभिनंदनीय बातमी आहे आणि ती खरी असेल तर मदतीबद्दल संस्थानी मंत्र्याचा मी फार आभारी आहे. उपकुलगुरुंनी कॉलेजच्या मार्गातील इतर अडचणी दूर करणे एवढेच आता बाकी राहते. मी त्यांना विनंती करतो की उस्मानिया युनिव्हर्सिटीचे कॉलेज औरंगाबादेहून दुसऱया एखाद्या ठिकाणी हलविण्यात यावे आणि मुंबई राज्यातील लगतच्या जिल्ह्यातील कॉलेज-फी च्या प्रमाणात आम्हाला फी वाढ करण्याची परवानगी मिळावी. माझ्या विनंतीचा ते

विचार करतील अशी मला आशा आहे.

सोसायटीने मोठी धोंड शिरावर घेऊन हे कॉलेज सुरू केलेले आहे. ती

धोंड किती आहे याची फारच थोड्यांना कल्पना आहे. हैद्राबाद संस्थानातील