१-९-१९५१ आमच्या सर्व सामाजिक दुखण्यांवर उच्च शिक्षण हेच औषध - Page 285

आमच्या सर्व सामाजिक . . . . हेच औषध २४५

समाजाची उन्नती करणे म्हणजे त्यांच्या अन्न, वस्त्र व निवाऱ्याची सोय करून पूर्वीप्रमाणेच त्यांना उच्च वर्गाची सेवा करावयास लावणे नव्हे. खालच्या वर्गाची ज्याच्यामुळे प्रगती खुंटून त्यांना दुसऱ्याचे गुलाम व्हावे लागते तो न्यूनगंड त्यांच्यातून नाहीसा करणे, चालू समाजपद्धतीमुळे जे त्यांचे जीवन निर्दयपणे लुबाडण्यात आले आहे त्याचे त्यांच्या स्वतःच्या आणि राष्ट्राच्या दृष्टीने काय महत्त्व आहे याची त्यांना जाणीव करुन देणे हाच खालच्या वर्गाचा प्रश्‍न आहे. उच्च शिक्षणाच्या प्रसाराखेरीज कशानेच हे साध्य होणार नाही. आमच्या सर्व सामाजिक दुखण्यावर, माझ्या मताप्रमाणे, हेच औषध आहे.

अध्यक्ष महाराज, शिक्षण प्रसाराच्या कार्यासाठी काहीतरी करावे हे माझे लहानपणापासूनचे स्वप्न आहे. माझे स्वप्न मी सत्यसृष्टीत आणू शकलो याचा मला आनंद होत आहे. त्यापेक्षा कॉलेजच्या इमारतीची कोनशिला बसविण्यास आपण येथे आलात याचा मला अधिक आनंद होत आहे. कॉलेज इमारतीची कोनशिला बसविण्यास आणि आम्हाला. आशीर्वाद देण्यास, विद्या व संस्कृतीच्या दृष्टीने आपल्यापेक्षा योग्य कोणी व्यक्ती नाही. मी जे म्हणतो ती खुशामत नाही. मी म्हणतो त्यावर विशवास असू द्या. अध्यक्ष महाराज, आता मी आपणाला कोनशिला बसविण्याची विनंती करतो.