२७-१०-१९५१ मी नदीच्या प्रवाहालाच वळविणाऱ्या भक्कम खडकासारखा आहे - Page 289

मी नदीच्या . . . . खडकासारखा आहे २४९

आता, येत्या सार्वजनिक निवडणुकीसंबंधी सांगायचे म्हणजे, ही निवडणूक शेड्यूल्ड कास्द्सूच्या लोकांनी त्यांच्या जीवन-मरणाचा लढा आहे असे समजून येत्या काळात जोमाने कार्य करावे. आपले उमेदवार निवडून आणण्यासाठी आपली सर्व शक्ती पणाला लावावी. मनुष्यमात्राला या जगात शक्तीचा पुरवठा संपत्ती आणि लोकसंख्या बळातून होत असतो. आपण अल्पसंख्य आहोत आणि

आपण धनवानही नाही. प्रत्येक खेड्यात आपली संख्या एकूण लोकसंख्येच्या

शेकडा ५ पेक्षा अधिक नाही. ९५ टक्के लोकांच्या संघशक्तीच्या आणि त्यांच्या संपत्तीच्या तुलनेत आपण हतबल आहोत. पोलीस मुख्यतः उच्चवर्णीय लोकांपैकीच असल्यामुळे आपल्या खऱ्याखुऱ्या तक्रारीचीही दाद घेत नाहीत; उलट तक्रार केल्याबद्दल धारेवर धरण्यात येते. दारिक्र्यामुळे अधिकारी वर्गास आपल्या बाजूस वळवून घेण्यासही आपण असमर्थ ठरतो. परंतु आपणाला एक शक्ती प्राप्त होऊ शकते ती म्हणजे राजकीय शक्ती ! ही शक्ती आपण मिळविलीच पाहिजे. या शक्तीने सुसज्ज होऊन आपण आपल्या लोकांचे हितसंरक्षण करू शकतो.

या देशाने जे स्वातंत्र्य प्राप्त केले त्या स्वातंत्र्याने तुम्हाला या राज्यशक्तीची हमी दिलेली आहे काय ? आपल्या देशाच्या स्वातंत्र्याच्या आम्ही कधीच विरोधी नव्हतो. परंतु आम्हाला एका प्रश्‍नाचे सरळ उत्तर हवे होते. स्वतंत्र भारतामध्ये आमची अवस्था कशी राहील? हा प्रश्‍न मी गांधीजीसमोर आणि अन्य पुढाऱ्यांसमोर ठेवला. त्यांच्या ' स्वराज्या ' मध्ये आमची अवस्था कशी राहील हे आम्हाला जाणून घ्यावयाचे होते. आमच्यावरील जाचणूकीचा अंत होईल काय ? आमच्या मुलांच्या शिक्षणाची सोय होईल काय ? आमचे लोक भारताचे स्वतंत्र नागरिक म्हणून जीवन जगण्यास समर्थ होतील काय ? अत्याचार आणि पिळवणूक थांबेल काय? आमच्या स्त्रियांची अब्रू सुरक्षित राहील काय ? गांधीजी किंवा कोणत्याही अन्य नेत्याने या प्रश्‍नांची उत्तरे समाधानकारकपणे किंवा आढेवेढे न घेता सरळसोटपणे दिली नाहीत.

गोलमेज परिषदेत पहिल्या प्रथम हा प्रश्‍न मी समोर ठेवला आणि मुसलमान, खिश्चन, शीख व इतर अल्पसंख्यांकांप्रमाणे अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदार संघाची ` मागणी केली. अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदार संघ असावा या न्याय्य मागणीला गोलमेज परिषदेत माझ्या देशवासियांकडून मला समर्थन प्राप्त होऊ शकले नाही. तथापि माझ्या लोकांसाठी मी राजकीय हक्क मिळविले. त्यानंतर काय घडले हे या देशातील प्रत्येकाला माहीत आहे. एवढे सांगितले म्हणजे पुरे की . आधुनिक भारताच्या इतिहासात प्रथमतःच आम्ही जे इक्क प्राप्त केले ते राजकीय