मी नदीच्या . . . . खडकासारखा आहे २५३
स्वाभिमान आणि ऐक्य या बळावर फेडरेशन यशस्वी होईल हे निश्चित. फक्त आपण जिद्दीने व खुणगाठ बांधून प्रयत्न केले पाहिजेत. मी तुम्हा सर्व बंधु-भगिनींना असे आवाहन करतो की मतदानाच्या दिवशी तुम्ही सर्व कामे बाजुला सारून तुमच्या मतदानाच्या हक्काची अंमलबजावणी करा.
काँग्रेसने आमच्यात फूट पाडू नये म्हणून शेड्यूल्ड कास्ट्सच्या लोकांनी पहारा दिला पाहिजे. काँग्रेसच्या बोलघेवड्या प्रचाराच्या आणि काँग्रेसवाल्यांच्या वाचाळ बोलण्याच्या त्यांनी आहारी जाऊ नये. त्याचप्रमाणे तुम्ही '' ठेविले अनंते तैसेचि राहावे “ अशाप्रकारची समाधानी वृत्तीही ठेवू नये. तुम्ही सतत सतर्क राहिले पाहिजे. आपणाला राखीव जागा केवळ दहा वर्षासाठी आहेत याची आपण सतत आठवण ठेवावयास हवी. अस्पृश्यतेचा पूर्णतः नायनाट होईपर्यंत या राखीव जागा चालू राहाव्यात अशी माझी इच्छा होती. सरदार पटेलांनी या माझ्या ठरावाला संसदेत आणि संसदेच्या बाहेर मोठ्या आवेशाने विरोध केला. सरदार पटेलांचे एक सोडाच परंतु अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून काँग्रेसने नेमलेल्या घटनासमितीतील ३० हरिजनांना सुद्धा माझ्या ठरावाला पाठिबा देण्याची हिंमत झाली नाही. सरदार पटेलांच्या पावलावर पाऊल ठेवून चालण्यापेक्षा हे काँग्रेसचे हस्तक दुसरे काय करू शकणार ! निवडणुकीचे तिकिट खुंट्याला बांधून होतेच आणि या संधिसाधू व सत्तापिपासू लोकांकडून
दुसरी कोणतीही अपेक्षा कोणी करू शकत नाही. या राखीव जागा फक्त दहा
वर्षपर्यंतच राहाणार आहेत. या दहा वर्षाच्या काळानंतर आपण काय करणार
आहोत. आपणाजवळ मजबूत संघटन नसेल तर देशाच्या राजकारणात
आपणाला कोणतेही स्थान असू शकत नाही. 'अछूत' लोक जर एकसंध अशा
एका जातीत संघटित झाले तर आपण राजकारणात काही स्थान प्राप्त करू
शकतो. आपले मजबूत व एकसंध संघटन करण्यासाठी आपण दहा वर्षेपर्यंत
थांबू नये. ही संघटना आतापासूनच बांधली पाहिजे; ही संघटना आजच आपण
बांधली पाहिजे.होय, उद्याही नव्हे, परवाही नव्हे तर आजच ! जर या दहा वर्षांच्या
अवधीत आपण आपली संघटना दृढ आणि मजबूत पायावर उभी करून कार्यरत
केली नाही तर या दहा वर्षानंतर 'मनुस्मृती-राज' स्वीकारण्याचे दुदैव आपल्या
नशिबी येईल. वस्तुतः अशी संघटना आधीच आपणाजवळ आहे. आपली
फेडरेशन हीच आपली संघटना होय. आपणाला फक्त ती मजबूत करावयाची
आहे. झाड आधीच लावण्यात आलेले आहे. आपणाला फक्त त्याला पाणी
घालून त्याची जोपासना करावयाची आहे. निवडणूक आयुक््ताकडून आपली
फेडरेशन ही अखिल भारतीय स्वरुपाची संघटना असल्याचे मान्य करण्यात
आले आहे. आपणाला नवीन घर बांधावयाचे नाही; घर पूर्वीचेच आहे.