२८-१०-१९५१ आमचे सच्चे प्रतिनिधी विधानसभा आणि संसदेत असले तरच ते आपल्या हितासाठी लढा देतील - Page 295

२८१
आमचे सच्चे प्रतिनिधी विधानसभा आणि संसदेत
असले तरच ते आपल्या हितासाठी लढा देतील

दिनांक २८ ऑक्टोबर १९५१ रोजी लुधियाना येथे डॉ. बाबासाहेब आंबेंडकरांचे भाषण झाले, ते आपल्या भाषणात म्हणाले,

प्रिय बंधु आणि भगिनींनो,

माझ्या लोकांशी बोलण्यासाठी लुधियानाला येण्याची ही माझी पहिलीच वेळ आहे. यापूर्वी बरेचदा या ठिकाणी येण्यासंबंधी योजना मी आखली होती परंतु अनिवार्य परिस्थितीमुळे मला तसे करता आले नाही. आपण सर्वजण येथे एकत्र जमला आहात हा किती मंगलदायक प्रसंग आहे.

तुम्हाला माहितच आहे की दोन किंवा तीन महिन्यानंतर निवडणुका घेतल्या जाणार असून त्यात अनेक पक्ष भाग घेणार आहेत. शेड्यूल्ड कास्ट्स्‌ फेडरेशनही या निवडणुकीत आपले उमेदवार उभे करणार आहे. विधानसभेसाठी व मध्यवर्ती संसदेसाठी शेड्यूल्ड कास्ट्स्‌साठी ठेवलेल्या सर्व राखीव जागा आणि जेथे आमचे मतदार पुरेशा संख्येत आहेत अशा काही सर्वसामान्य जागी आम्ही निवडणूक लढविणार आहोत. आमचे उमेदवार विजयी होतील अशी मला आशा आहे. आमच्या उमेदवारांचे यश मुख्यतः आमच्या मतदारांवरच अवलंबून असते. आपल्या सर्व मतदारांनी आपल्या उमेदवारासच मते दिली तर ते यशस्वी होतील अशी माझी खात्री आहे. म्हणून शेड्यूल्ड कास्ट्स्‌ आणि अन्य मागासवर्मीय लोकांची जी शेड्यूल्ड कास्ट्स्‌ फेडरेशन ही एकमेव संघटना आहे, त्या संघटनेने उभ्या केलेल्या उमेदवारांनाच सर्व शेड्यूल्ड कास्ट्सूच्या लोकांनी

आपली मते द्यावीत अशी मी विनंती करतो.

भारतावरील ब्रिटिश सत्तेच्या काळात ब्रिटिशांनी आम्हाला कसे फसविले हे मी

तुम्हास सांगतो. ते भारतापासून शेकडो मैल दूर राहात असले तरी भारतात

त्यांचे राज्य स्थापण्यात यशस्वी झाले. प्रथमतः ईस्ट इंडिया कपनी भारतात .- आली तेव्हा तिचा हेतू केवळ व्यापार करण्याचा होता. क्रमाक्रमाने येथे आपले

राज्य स्थापावे याबद्दल इंग्रज लोक कार्योत्सुक झाले. हा त्यांचा हेतू साध्य

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भाषणे : संपा. मा. फ. भांजरे, खंड ७, पृ. ५७-६५.