आमचे सच्चे प्रतिनिधी . . .. . हितासाठी लढा देतील २५७
आपणाला काहीसुद्धा मिळाले नाही. ज्यांना न्यायाबद्दल जरासुद्धा आस्था नाही अशा आमच्या देशवासी हिंदुंच्या दयेवर आम्हाला सोडून देण्यात आले. यावरून गरीब बिचाऱ्या शेड्यूल्ड कास्ट्सूच्या लोकांना अन्य लोक कशी वागणूक देतात हे तुम्ही समजू शकता. आजपर्यंत आपण मागासलेले का राहिलो याचे हे कारण आहे. ` आता, मी तुमच्यासमोर एक प्रश्न ठेवू इच्छितो. अजूनही तुम्हाला तसेच मागासलेले राहून सवर्ण हिंदुंच्या हाताखाली गुलाम होऊन राहावयाचे आहे काय ? जेव्हा आर्य भारतात आले तेव्हा वर्णव्यवस्था कार्यरत झाली. लोकांना त्यांच्या जन्मावरून सामाजिक दर्जा देण्यात आला. काहींना ब्राह्मण म्हणण्यात _ आले, काहींना क्षत्रिय, काहींना वैश्य, काहींना शूद्र आणि इतरांना 'अस्पृश्य.' या श्रेणीनुसार अस्पृश्य सर्वाच्या खालचे आणि समाजापासून पूर्णतः वेगळे होते. सवर्ण हिंदू आणि अस्पृश्य यांच्यातील संबंध पाय आणि जोडा अशाप्रकारचा आहे. आपण जेव्हा घरात शिरतो तेव्हा जोडा घराबाहेरच ठेवंतो. त्याचप्रमाणे 'अछूत' लोकांना समाजाच्या बाहेर ठेवण्यात आले आणि त्यांना कसल्याही प्रकारचे अधिकार देण्यात आले नाही. सवर्ण हिंदुंकडून . आम्हाला देण्यात आलेली अपमानकारक वागणूक आम्ही शेकडो वर्षे सहन केली आणि अजूनही सामाजिक, आर्थिक आणि राजकीयदृष्ट्या होत असलेला जुलूम आम्ही सोशीतच आहोत.
अनेक वर्षे झगडल्यानंतर आपण काही राजकीय हक्क प्राप्त केलेले आहेत. आणि त्यांचा समावेश खुद्द भारतीय राज्य घटनेतच करण्यात आला आहे. वीस वर्षाइतक्या लांब काळापर्यंत मी महात्मा गांधींच्या विरुद्ध लढा दिला. आपणाला कोणतेही वेगळे अधिकार देण्याच्या कल्पनेच्या ते विरुद्ध होते. त्यांचा युक्तिवाद असा होता की, जर अस्पृश्यांना वेगळे हक्क देण्यात आले तर ते हिंदू जीवन पद्धतीत येण्याला कधीही पात्र ठरणार नाहीत. याशिवाय ते नेहमीसाठी हिंदुंपासून तुटक राहातील. गोलमेज परिषदेतही आमच्या स्वतंत्र मतदारसंघाच्या मागणीला महात्मा गांधींनी विरोध केला. इतक्या मोठ्या काळपर्यंत झगडून आपण थोडेसे राजकीय हक्क मिळविलेले आहेत. आता शेड्यूल्ड कास्ट्स्साठी राखीव असलेल्या जागेवरून आपण आपले प्रतिनिधी विधानसभा आणि संसदेत पाठवू शकतो.
हे आपले हक्क हिसकावून घेण्यासाठी बरेच पक्ष कार्यरत झालेले आहेत. आपल्या लोकांसाठी राखीव असलेल्या जागेवरून आपले अनुचर निवडून आणण्यासाठी आपली मते त्यांना मिळावीत यासाठी हे पक्ष कार्यरत
आहेत. त्यांचा हेतू तुम्ही चांगल्यारीतीने समजू शकता. शेड्यूल्ड कास्ट्स्चे