२८-१०-१९५१ आमचे सच्चे प्रतिनिधी विधानसभा आणि संसदेत असले तरच ते आपल्या हितासाठी लढा देतील - Page 298

जश

२५८ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

लोक जेथे आहेत आणि जसे आहेत तसेच त्यांनी राहावे, त्यांनी राजसत्ता प्राप्त करू नये म्हणजे आज आपले लोक करीत असलेल्या तिरस्करणीय धंद्याची आबाळ होणार नाही असे त्यांना वाटते. म्हणून येत्या निवडणुकीत तुमच्या मताबद्दल तुम्ही सतर्क राहिले पाहिजे. आमच्या मतांच्या बळावर केवळ आपले खरे प्रतिनिधीच निवडल्या गेले पाहिजेत, दुसरे नाही, याची तुम्ही काळजी घ्यावी. असे झाले तरच तुमचे जे हक्क राज्यघटनेत समाविष्ट झाले आहेत ते सुरक्षित राहतील.

जर आपले खरे प्रतिनिधी विधानसभा आणि संसदेत निवडल्या गेले नाहीत तर आपण स्वातंत्र्याचा उपभोग घेऊ शकणार नाही. आपल्या लोकांकरिता स्वातंत्र्य हे एक नाटक ठरेल. हे स्वातंत्र्य हिंदू लोकांचे स्वातंत्र्य होईल, आपल्यासाठी नव्हे. परंतु जर आपले सच्चे प्रतिनिधी विधानसभा आणि संसदेत असले तर ते आपल्या हितासाठी लढा देतील आणि आपली दुःखे दूर करतील. फक्त तेव्हाच आपल्या मुलांना योग्य असे शिक्षण मिळेल; फक्त तेव्हाच आपले दारिद्र्य दूर होऊ शकेल आणि फक्त तेव्हाच जीवनाच्या _ सर्व क्षेत्रात आपणाला बरोबरीचा वाटा मिळेल. भारतीय राज्यघटनेमध्ये जरी शेड्यूल्ड कास्ट्सूच्या लोकांना खास हक्क देण्यात आलेले आहेत तरीसुद्धा अन्य पक्ष विशेषतः कॉँग्रेस त्यामध्ये विनाकारण ढवळाढवळ करीत आहे. शेड्यूल्ड . कास्ट्सूसाठी राखीव असलेल्या जागांवर निवडणुकीसाठी ते आपले अनुचर उभे । करीत आहेत. काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेल्या लोकांना त्यांच्या धन्याच्या इच्छेनुसार वागावे लागते त्यामुळे ते आमच्या हितांचे संरक्षण कसे करु शकतील ? आमच्यासाठी ते काय करु शकतील ?

अस्पृश्य लोकांसाठी राखीव असलेल्या जागेवरुन कॉग्रेसच्या तिकिटावर संसदेमध्ये निवडून गेलेल्या सभासदासंबंधीची माहिती मी तुम्हास सांगू इच्छितो. त्यांची संख्या जवळजवळ ३० होती आणि मागील चार वर्षांपासून ते संसदेत होते. या ३० सभासदांपैकी. एकानेही अस्पृश्यांच्या गाऱ्हाण्याबद्दल एकही प्रश्‍न संसदेत कधी विचारला नांही. जर कोणी एखादा प्रश्‍न संसदेत उपस्थित केला असेल तर सभाध्यक्षांनी त्याला परवानगी दिली नाही आणि तो विषय तेथेच संपला. जर एखादेवेळी सभाध्यक्षांनी उदार होऊन एखादा प्रश्‍न सभेच्या कामकाजात समाविष्ट करण्याची परवानगी दिलीच तर काँग्रेसचा मुख्य प्रतोद त्या संबंधित सभासदाकडे जाऊन तो प्रश्‍न छापण्याच्या अगोदरच परत घेण्यास सांगत असे. एखादे वेळी चुकून जर असा प्रश्‍न छापण्यात आलाच तर. त्याचे जेव्हा उत्तर देण्याची वेळ येई तेव्हा प्रश्‍न विचारणाऱ्या त्या सभासदाने गैरहजर राहावे असे त्या सभासदाला मुख्य प्रतोद सांगत असे आणि ज्याने प्रश्‍न