२८-१०-१९५१ आमचे सच्चे प्रतिनिधी विधानसभा आणि संसदेत असले तरच ते आपल्या हितासाठी लढा देतील - Page 299

आमचे सच्चे प्रतिनिधी ... . . हितासाठी लढा देतील २५९

विचारला तोच सभासद हजर नसल्यामुळे त्या प्रश्‍नावर चर्चा होत नसे. गेला एक महिना अंदाजपत्रकावर संसदेत चर्चा चालू आहे. यावेळी कोणीही सभासद या अंदाजपत्रकावरील चर्चेत भाग घेऊन अशाप्रकारची तरतूद त्याच्या समाजासाठी किवा पक्षासाठी करण्यात यावी असे मत मांडू शकतो. तो निदर्शनास आणू शकतो की, इतकी मोठी रक्‍कम अमुक तमुक अनावश्यक योजनेवर खर्च होत आहे आणि अमुक तमुक महत्त्वाच्या योजनांकडे दुर्लक्ष होत आहे. एकाही हरिजन सभासदाला एखादा 'कटमोशन' मांडताना मी या चार वर्षाच्या काळात पाहिलेले नाही. हे सर्व काँग्रेसच्या दंड्यामुळे घडते. सभासदांना जर काही ठराव मांडावयाचा असेल तर तो ठराव प्रत्यक्ष मांडण्यापूर्वी बरेच आधी त्याला मुख्य प्रतोदाची परवानगी हासिल करावी लागते. या चार वर्षात या सभासदांनी कधीही बिल मांडले नाही. अस्पृश्य, भारतीय खिश्चन आणि अँग्लो इंडियन इत्यादी लोकांसाठी राज्यघटनेद्वारा जे अधिकार दिलेले आहेत ते जर काँग्रेसच्या द्वाराने त्यांच्या शत्रुंनी काबीज केले तर त्या अधिकाराचा फायदा काय ? |

जर तुम्ही काँग्रेसला मते दिलीत तर तुम्हाला नेहमीसाठी दु:ख भोगावे लागेल हा मुद्दा मी स्पष्ट करू इच्छितो. काँग्रेसच्या तिकिटावर निवडून गेलेले आपले प्रतिनिधी विधानसभा आणि संसदेत तोंड मिटून बसतील. शेड्यूल्ड कास्ट्स्‌ फेडरेशन हीच आपली एकमेव संघटना असल्यामुळे तिच्या तिकिटावर निवडून गेलेले आपले सच्चे प्रतिनिधीच आपल्या हितांचे संरक्षण करू शकतात. काँग्रेसमध्ये राहून आपली दु:खे दूर करण्याचा काही संभव असता तर ती संघटना मी अव्हेरली नसती. मला माहीत आहे की काँग्रेसजवळ रग्गड पैसा आहे आणि त्याद्वारे ती मते विकत घेण्याचे प्रयत्न करील. : परंतु तुम्ही याबाबत सतक राहिले पाहिजे. मला जर हवे असते तर काँग्रेस सरकारात मी नेहमीसाठीच राहू शकलो असतो आणि निश्‍चितच मला तेथे एखादी चांगली जागा मिळाली असती. परंतु जर माझा हेतू स्वार्थी असता आणि माझ्या समाजासंबंधी मला काही आस्था नसती तरच मी तसे करू शकलो असतो. मला एखाद्या लायसन्सची अगर परमिटची आवश्यकता असती तरच मी तिथे राहिलो असतो. लायसन्स आणि परमिट मिळविणारा माणूस समाजहिताचा बळी देऊनच तसे करू शकतो. काँग्रेस सरकारात मी असतानाच्या काळात आलेला हा माझा अनुभव आहे.

इंग्रजांनी मनात आणले असते तर ते त्यांच्या येथील वास्तव्याच्या काळात आपल्या समाजाच्या उन्नतीसाठी काही काम करू शकत होते. परंतु त्यांनीही आम्हाला फसविले. तो काळ आता निघून गेला आणि दुसरे अवस्थांतर आता अस्तित्वात आले आहे. इंग्रज आम्हाला सोडून गेले. दुसरे लोक आता राज्य- सत्तेवर आले. यावेळी तरी आपण सतर्क राहिलो नाही आणि डोळे मिटून बसलो