आमचे सच्चे प्रतिनिधी . . . . . हितासाठी लढा देतील २६१
काही दिवसांपूर्वी पंडित नेहरू येथे आले होते. असे सांगण्यात आले की दोन किवा तीन लाख लोक त्यांचे भाषण ऐकण्यासाठी येथे जमले होते. किती लोक तेथे होते हे काही मला माहीत नाही. काल जेव्हा मी जालंदरला भेट दिली तेव्हा दोन लक्षांपेक्षाही जास्त लोक तेथे जमले होते परंतु हिंदू आणि काँग्रेसी वर्तमानपत्रांनी तेथे अंदाजे फक्त ३५ हजार लोक जमल्याचे लिहिले आहे. मला तुम्हास सांगावयाचे आहे ते हे की, जर काँग्रेसची एखादी परिषद असली तर श्रोते अगदी थोडे असले तरीसुद्धा ते प्रसिद्ध करतील की या परिषदेला फार मोठा जनसमूह जमला होता. पाच असले तर पन्नास, पन्नासाला ते पाचशे म्हणतील, पाचशेला ते पांच हजार म्हणतील आणि पाच हजाराला ते पाच लाख जमले म्हणून लिहितील. या वर्तमानपत्रांनी अशाप्रकारे खोटी माहिती दिल्याबद्दल आणि खोटी टीका केल्याबद्दल मला काहीच नवल वाटत नाही. ही वर्तमानपत्रे पुष्कळ वर्षापासून माझ्यावर टीका करीत आली आहेत. तरीसुद्धा माझी शारीरिक आणि मानसिक प्रगती होतच आहे. फार मोठ्या जनसमूहासमोर भाषण देण्याची मला आवड नाही. मला जे हवे आहे ते इतकेच की, या हिंदू लोकांकडून होणाऱ्या अत्याचारांना तोंड देण्याकरिता आमच्या लोकांनी संघटित व्हावे, माझे विचार त्यांनी ऐकावे एवढीच माझी इच्छा आहे. मग ते फार मोठया संख्येने जमोत की
लहान संख्येने, ही गोष्ट महत्त्वाची नाही.
प्रत्येक राजकीय पक्षाने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. प्रत्येक
पक्षाने तो निवडून आल्यास हे करू आणि ते करू अशी आश्वासने दिली
आहेत. शेड्यूल्ड कास्ट्स् फेडरेशननेही आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला
आहे. सर्वांच्या आधी काँग्रेसने आपला जाडजूड जाहीरनामा प्रसिद्ध
केला. परंतु जेव्हा त्यांना समजून आले की सर्वसाधारण लोकांना तो आकलन
होणार नाही तेव्हा त्यांनी त्यात बदल केला आणि त्याला लहान रूप देण्यात
आले. दिवसेंदिवस त्यांचा जाहीरनामा लहान लहान होत जाईल आणि एक
दिवस असा येईल की, काँग्रेसचा जाहीरनामा राहाणार नाही असे मला
वाटते. जाहीरनाम्यात काय असावे आणि काय नसावे हे मी तुम्हास सांगू
इच्छितो. माझे सर्व राजकीय पक्षांना आव्हान आहे की, त्यांनी सर्वात उत्तम
जाहीरनामा कोणता हे निवडण्यासाठी एक कमिटी बनवावी. मला मुळीसुद्धा
शंका नाही की आमचा जाहीरनामाच सर्वश्रेष्ठ ठरेल. सर्व पक्षांनी आपापल्या
जाहीरनाम्यात जनतेला नाना प्रकारची आश्वासने दिलेली आहेत. आश्वासने
देणे फार सोपे आहे परंतु ती प्रत्यक्षात उतरविणे अत्यंत कठीण आहे. एका
गोष्टीचे तुम्ही आश्वासन देत असाल तर तुम्ही शंभर गोष्टीचेही आश्वासन देऊ
शकता. जाहीरनामा हा केवळ आश्वासनांची जंत्री असू नये. देशाला ज्या