२८-१०-१९५१ आमचे सच्चे प्रतिनिधी विधानसभा आणि संसदेत असले तरच ते आपल्या हितासाठी लढा देतील - Page 303

आमचे सच्चे प्रतिनिधी .. . . . हितासाठी लढा देतील २६३

येत्या निवडणुकीत भाग घेणाऱ्या प्रत्येक राजकीय पक्षाला एक पक्षचिन्ह देण्यात आले आहे. आपल्या फेडरेशनचे चिन्ह ' हत्ती ' आहे. आपल्या लोकांच्या मनात कोणताही गोंधळ निर्माण होऊ नये म्हणून मी हे चिन्ह निवडले आहे. काही पक्षांनी बैल, घोडा आणि गाढव अशी चिन्हे निवडली आहेत ठळकपणासाठी मी ' हत्ती ' निवडला आहे.

आपल्या निवडीच्या एकाच उमेदवाराला आपल्याजवळील सर्व मतपत्रिका या निवडणुकीत देता येणार नाहीत. कारण यावेळी ' एकत्रित ' (Cumulative) मतदान पद्धती नाही. आता ' विभाजित ' (Diऽध०७६।४९) मतदान पद्धती आहे. म्हणून निरनिराळया उमेदवाराला आपल्याजवळील मतपत्रिका द्यावयाच्या आहेत; एक सर्वसाधारण जागेवरील उमेदवाराला आणि दुसरी राखीव जागेवरील उमेदवाराला. राखीव जागेवरून निवडणूक लढविणाऱ्या आपल्या उमेदवाराला आपण आपल्या जवळील दोन्ही मते देवू शकत नाही. त्याला आपण एकच मत देवू शकतो व सर्वसाधारण जागेवर उभ्या असलेल्या दुसऱ्या कोणालातरी दुसरे मत द्यावे लागणार आहे. म्हणून जो पक्ष आपले दुसरे मत आमच्या उमेदवारास व आपले दुसरे मत आपण त्यांना देऊ अशा दुसऱया पक्षाशी आपण समझोता केला पाहिजे. आपली हातमिळवणी कोणत्या पक्षाशी करावी हे आपण अजून ठरविलेले नाही. पुष्कळ पक्ष आमचेकडे मैत्रीसाठी आले परंतु अंतिम स्वरूपाचे

अजून काही ठरविलेले नाही, बोलणी चालू आहेत. एखाद्या पक्षाशी हातमिळवणी

करण्यापूर्वी आपणाला खूप विचार केला पाहिजे. परंतु कोणत्यातरी पक्षाशी

आपणाला मैत्री केलीच पाहिजे.

शेवटी मला हेच सांगायचे आहे की पंजाब, उत्तर प्रदेश आणि अन्य दूरदूरच्या

प्रदेशातून हजारो लोक दिल्लीला माझ्याकडे आपली गाऱ्हाणी सांगण्याकरिता येत

असतात. काहींचे गाऱ्हाणे असते की जमीनदाराने त्यांना मारपीट केली आणि

जेव्हा त्यांनी संबंधित अधिकाऱ्याकडे दाद मागितली तेव्हा त्याच्याविरुद्ध निर्णय

देण्यात आला, कारण अधिकाराच्या जागेवर असलेले लोक सवर्ण हिंदू

होते. अशा प्रकारच्या इतक्या तक्रारी आहेत की रिकाम्या हाताने त्यांचा परामर्श

घेणे असंभव आहे. पुष्कळ लोक निराश होऊन आपल्या गावी परत

जातात. म्हणून दिल्लीत एक इमारत उभारण्याचे मी ठरविले आहे. तेथे

आपला एक वकील राहील. तो आपल्या लोकांच्या तक्रारींकडे लक्ष देऊन त्या

त्या प्रकरणात सल्ला देईल. आपण यापूर्वीच या कामासाठी दिल्लीत एक

जमिनीचा तुकडा खरेदी केला आहे; त्या जागेवर इमारत उभारावयाची

आहे. तेथेच आपल्या फेडरेशनचे कार्यालय राहील. बाहेरून येणाऱ्या