२६४ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
लोकांचे तेथे स्वागत होईल आणि त्यांच्या तक्रारी ऐकून घेतल्या जातील. या बिल्डिंगच्या बांधकामासाठी अत्यंत आवश्यक असूनही पुरेसा पैसा नाही म्हणून तुम्हा सर्वांना माझी विनंती आहे की तुम्ही तुमच्या शक्तीनुसार वर्गणी द्यावी. अशाप्रकारे आपला हेतू आपण साध्य करू शकू. दिल्लीचे बाबा तुलादास हे इमारत निधी गोळा करण्यासाठी पंजाबचा दौरा करतील. या उदात्त कार्यासाठी तुम्ही सर्वानी उदारपणे मदत करावी अशी पुन्हा एकदा मी विनंती करतो.