देशाच्या आपत्तीच्या प्रसंगी आम्ही आघाडीवर राहू २६७
मंत्र्यांवर असे गंभीर आरोप आहेत. याबाबतीत अशाच एका ब्रिटिश मंत्र्याच्या बाबतीत घडलेल्या घटनेचा उल्लेख करणे जरुर आहे. एका मंत्र्यावर लाचलुचपतीचा आरोप होता. मजूर प्रमुख मंत्री मि. अंटली यांनी लगेच चौकशी कमिशन नेमले. चौकशीअंती असे दिसून आले की, एका व्यापाऱ्याने त्या मंत्र्याला नाताळात एक व्हीस्कीची बाटली व काही कापड दिले होते. दोघांचा उद्देश देवघेवीचा नव्हता. बाब क्षुल्लक होती पण अँटलींनी त्यास मंत्रिपदाचा राजीनामा देण्यास भाग पाडले.
पण आपल्या देशात काय परिस्थिती आहे पहा ! वेगवेगळ्या प्रांतांतील जवळ जवळ पंचवीस मंत्र्यांवर गंभीर आरोप केले गेले आहेत पण काँग्रेस हायकमांडने याकडे बुद्धिपुरःसर दुर्लक्ष केले आहे. एवढेच नव्हेतर यांच्यावरील आरोपांची चौकशी न होता ते मंत्री बिनबोभाट आपला अनागोंदी कारभार करीत आहेत व अशांच्या हाती आपल्या देशाचे भवितव्य आहे ! सांगा, अशा मंत्र्यांबद्दल आणि काँग्रेसबद्दल विशवास कसा बरे निर्माण होईल ? सांगा, स्वाभिमानी व नीतीमान पुरुष अशा चोरांबरोबर सहमत कसे होतील की जे उघड लोकांना लुबाडीत आहेत. मी तर स्पष्ट सांगतो की काँग्रेस सरकार हे आचारभ्रष्ट (Corrupt) सरकार आहे. ते चोरांचे सरकार आहे.
पंडित नेहरू हे अशा बदमाश मंत्र्यांच्या कारभाराकडे लक्ष घालतील अशी लोकांची अपेक्षा होती पण त्यांनी आपल्या अनुयायांची मोठी निराशा केली. उलट दिल्लीमध्ये काँग्रेसचे अधिवेशन भरले तेव्हा त्यात इतर देशात लाचलुचपतीचे प्रकार फार मोठ्या प्रमाणात होतात, असे त्यांनी सांगितले, त्यामुळे जे मुरब्बी प्रतिष्ठित चोर आहेत त्यांना फावते व जे पक्के चोर होण्याची टंगळ मंगळ करतात, त्यांनाही धीर येतो, जे अशी लाचलुचपत घेऊन गबर होत आहेत, असे मंत्री पंडित जवाहरलाल नेहरू आपले नेते आहेत म्हणून खूष असतील कारण अशा गुन्ह्यांबद्दल शिक्षा न करता त्यांना माफ करणे किंवा त्याकडे दुर्लक्ष करणे पंडितजी आपला धर्म समजतात. ज्यांना असल्या गोष्टी करण्याची शरम वाटत नाही ते
देशाचे कधी हित करतील काय ?
जे यापुढे काँग्रेसला मते देतील ते अशा गोष्टो चालू राहाव्यात म्हणूनच मते
देतील, पण भारतीयांना चांगले कोणते व वाईट कोणते हे ओळखण्याची पात्रता
आली आहे.
काँग्रेसचे लोके इतरांना आपापले पक्ष सोडा आणि कॉग्रेसला मिळा असा आदेश
देतात कारण काँग्रेसच देशाचे भले करणार आहे. मी तुम्हाला विचारतो की,
मांजर आणि उंदीर एकत्र राहू शकतील का ? साप आणि मुंगूस यांची मैत्री
जुळेल का ? एक दुसऱ्याचा सत्यानाशच करील. अशी कित्येक उदाहरणे
प्राणिमात्रात आढळतात. माणसामाणसात सुद्धा हाच प्रकार आहे. देशात