१५-११-१९५१ योजना कोणी केली ते पाहता ती कशी आहे ते पाहा - Page 311

२८३
योजना कोणी केली ते न पाहाता
ती कशी आहे ते पाहा

भुसावळ येथे दिनांक १५ नोव्हेंबर १९५१ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे

भाषण झाले. आपल्या भाषणात ते म्हणाले,

भगिनींनो आणि बंधुंनो,

| पूर्वी जेव्हा दारूबंदी नव्हती, सरकारी दारू दुकाने होती तेव्हा बेकायदा दारू | करण्याचे काम फारच कमी होते. कोणत्याही परराष्ट्रापेक्षा आमच्या देशात

दारूचे व्यसन फार आहे. आज दारूबंदी झाल्यानंतर मात्र घरोघरी दारूची

' निर्मिती सुरू झाली आहे. . घरीच दारू तयार होत असल्याने स्त्रियात, मुलातही . दारूचे व्यसन सुरू झाले आहे. नीतीचा अधःपात फार जोरात सुरू आहे.

' हे दारूचे व्यसन बंद करण्यासाठी म्हणून अत्यंत अल्पसंख्य अशा व्यसनाधीन

, दारूबाजांना व्यसनमुक्त करण्याचे यशस्वी प्रयत्न करण्यासाठी म्हणून

, सरकारने शिक्षण फार कठीण करून ठेवले आहे. केवळ प्राथमिक शिक्षण मिळून

: आज मागासलेला समाज पुढे येणे शक्य नाही. त्यांना उच्च शिक्षण दिले

: पाहिजे. हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत वरच्या वर्गाच्या हातातच राज्यकारभार

राहील आणि असे जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत मिळालेल्या स्वराज्याचा आम्हा

अस्पृश्यांना, मागासलेल्या वर्गातील लोकांना काय फायदा ?

ह्या दारूबंदीसाठी म्हणून मुंबई सरकारने १९४६ साली ९ कोटी रुपये

बुडविले. एवढेच नव्हे तर दारूबंदी कायदा जारी करण्यासाठी म्हणून पोलीस

। वगैरेसाठी गरीब नागरिकांचे ३-४ कोटी रुपये आणखी खर्च होत आहे. मला

: येथे जमलेल्या लोकांना एक प्रश्‍न विचारावासा वाटतो की समाजात अत्यंत

अल्पसंख्य असलेल्या अशा दारूबाजांना दारूच्या व्यसनापासून मुक्त करणे,

| नव्हे मुक्त करण्याचा भ्रम निर्माण करणे हे जास्त महत्त्वाचे की समाजातील

बहुसंख्य अशा भूकग्रस्त लोकास, ज्यांना अन्न मिळत नाही त्यांना जगविणे,

| ज्यांना कपडा नाही त्यांना निदान अंगभर वस्त्र मिळवून देणे, ज्यांना राहावयास

घर नाही त्यांना आसरा मिळवून देणे अधिक महत्त्वाचे ? ह्या प्रश्‍नाचे आपणच

उत्तर द्या.

जनता : १ डिसेबर १९५१.

दि (वाय) ४११--१९-अ