१७-११-१९५१ सत्तेवर कोणत्याही पक्षाला जनतेच्या सर्वागीण हितासाठी जोतीबा फुल्यांचे धोरण आणि लोकशाहीवादी तत्त्वज्ञान घेऊनच पुढे जावे लागेल - Page 317

सत्तेवर येणाऱया कोणाही . . . . . . पुढे जावे लागेल २७७

लागले. पण ह्या पक्षातील लोक केवळ नाममात्र अनुयायी राहिले ; जोतीबांचा कार्यक्रम, त्यांचे धोरण ह्यास या पक्षातील लोकांनी तिलांजली दिली. स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व आपल्याच हातांनी जमिनीत गाडून हे लोक काँग्रेसमध्येही सामील , झाले. हा ब्राह्मणेतर पक्ष काही काळाने नामशेष झाला.

जोतीबांचा अनुयायी म्हणवून घेण्यात मला ह्यापूर्वीही कधी लाज वाटली नाही आणि आजही वाटत नाही. आत्मविश्वासाने मी आज असे म्हणू शकतो की मीच तेवढा खरा आज जोतीबांना एकनिष्ठ राहिलो आहे आणि मला अशी खात्री आहे की ह्या देशात जनतेचे सर्वागीण हित करणारा असा कोणताही पक्ष पुढे आला, त्याने कोणतेही नाव धारण केले तरी त्याला जोतीबांचे धोरण, त्यांचे तत्त्वज्ञान

आणि त्यांचे कार्यक्रम घेऊनच पुढे यावे लागेल. तोच एक खराखुरा

लोकशाहीचा मार्ग आहे. समाजातील ८० टक्के लोकास विद्याप्राप्ती करू न देणे

आणि त्यांना सामाजिक, आर्थिक व राजकीय गुलामगिरीत जखडून ठेवणे हे

दिसत असता स्वराज्य, स्वराज्य म्हणून ओरडण्यात काय फायदा ? स्वराज्याचा फायदा सर्वांना मिळाला पाहिजे. मागासलेल्या वर्गाच्या सर्वागीण उन्नतीचा कार्यक्रम घेऊन पुढे आल्याशिवाय कोणताही पक्ष आज जनतेचे नेतृत्व घेऊ शकत नाही हे सूर्यप्रकाशाएवढे स्पष्ट आहे. समाजवादी पक्षानेही ह्या गोष्टीचा विचार करणे आवश्यक आहे, असे मला वाटते.

आजचा शेतकरी कामगार पक्ष हा ब्राह्मणेतर पक्षाची आवृत्ती म्हणून पुढे आला आहे. परंतु ब्राह्मणेतर पक्ष म्हणवून घेण्यास त्या पक्षास लाज का वाटते ते मला कळत नाही. ह्या पक्षाच्या पुढाऱ्यांशी जुने आणि फार घनिष्ठ संबंध आहेत आणि असे असतानाही ह्या पक्षाशी फेडरेशनने सहकार्य का केले नाही, ह्या प्रश्‍नाचे उत्तर मला आज द्यावयाचे आहे.

ह्या पक्षाबाबतची एक गोष्ट जगजाहीर आहे की हा पक्ष एकेकाळी कम्युनिस्ट पक्ष बनावयास पाहत होता. नाशिक जिल्ह्यातच दाभाडी येथे ह्या पक्षाची बैठक भरून ह्या पक्षाने एक प्रबंध मान्य केला. त्या प्रबंधास “ दाभाडी प्रबंध म्हणण्यात येते. हा प्रबंध पूर्णपणे कम्युनिस्ट तत्त्वज्ञानावर आधारलेला असा आहे. . कम्युनिझमला आज ह्या देशात जागा देण्यास मी तयार नाही. कदाचित पंडित नेहरूंच्या आंतरराष्ट्रीय राजकारणातील घोडचुकांमुळे कम्युनिझम हा येईलही ; आणि चीन व रशिया ह्यांच्या नियंत्रणाखाली हा देश जाऊन ह्या देशाचे स्वातंत्र्य लयास जाईल.