सत्तेवर येणाऱया कोणाही . . . ... . पुढे जावे लागेल २७९
लोकशाही राजवटीत हे होणे शक्य नाही, म्हणून हुकूमशाहीची प्रस्थापना येथे करण्यात येईल. विधीमंडळे नेस्तनाबूत करून लोकशाही राज्यपद्धतीला मूठमाती देऊन कम्युनिस्ट राजवट हे घडवून आणील. "' दाभाडी प्रबंध '' हे आमचे ब्रीद आहे असे बेंबीच्या देठापासून ओरडणाऱ्यांना आता तो प्रबंध म्हशीच्या गळ्यातील लोढण्यासारखा झाला आहे. शेतकरी कामगार पक्षाच्या पुढाऱ्यांना हे लोढणे काढणे आता जड झाले आहे. आता ते लोढणे फेकून देणे म्हणजे राजकीय अप्रामाणिकपणा असे त्यांना वाटते. परंतु आज ना उद्या ह्या पक्षास हे लोढणे दूर फेकलेच पाहिजे. जोतीबांचे अनुयायी म्हणविणाऱ्याँना कम्युनिझमची वाटचाल योग्य नाही हे लवकरच समजून येईल अशी आपण आशा करू या. |