एकांगी राजकारण कधीही यशस्वी होऊ शकत नाही २८१
आपल्या साऱ्यांचे पंचप्राण डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे मुंबईतूनच लोकसभेच्या जागेसाठी उभे आहेत. त्यांना या निवडणुकीत निवडून न येऊ देण्याचा काँग्रेसने चंग बांधला आहे. तरी आपण आपल्या जवळचे तन मन नि धन स्वार्थत्यागपूर्वक अर्पण करून आपले जे शीर (डॉ. बाबासाहेब आंबेडकर) ते येत्या निवडणुकीत सलामत ठेवले पाहिजे. हे ओळखून आपल्यातील कार्यकर्त्यानी, स्त्री-पुरुषांनी व आबालवृद्धांनी या कामी पराकाष्ठेचे प्रयत्न केले पाहिजेत. मुंबईतील जनता आतापर्यंतचा लौकिक कायम राखील नि त्वरित कामाला लागेल, ही आम्हास पुरेपूर आशा आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे हिमाचल प्रदेश व पंजाब प्रांतांचा दौरा आटोपून दिल्लीस आलेले आहेत. ते पायाने अधू तर झालेले आहेतच पण या दौऱ्यातील श्रमाने त्यांना नेत्र विकाराचा थोडासा त्रास झाला आहे. तरी ते मुंबई व मध्य प्रांतांच्या दौऱ्यावर तसेच निघणार होते परंतु फेडरेशनच्या हायकमांडच्या विनंती- नुसार थोडासा आराम घेऊन ते साधारणतः २० ते २५ नोव्हेंबरपर्यंत मुंबईस येणार आहेत. एवढ्या अल्पावधित आपण रात्रंदिवस खपून आपल्या निधीचा संकल्प
पुरा केला पाहिजे.
निवडणूक निधीचा पुरुषांकरिता दोन रुपये व स्त्रीयांसाठी एक रुपया अशा तर्हेची तिकीटे छापली असून ठिकठिकाणच्या वार्ड कमिट्यांकडे रवाना करण्यात
आलेली आहेत.
प्रतिष्ठित नागरिक, बाबासाहेबांचे चहाते व धन्देवाईक अशा सद््गृहस्थांची बसण्याची खास सोय करण्यात येणार आहे. मात्र त्यांनी उदार अंतःकरणाने
निवडणूक निधीस सहाय्य करावे.
तसेच महा. मुंबईतील निरनिराळया शिक्षण संस्था, व्यायाम मंडळ, कला पथक
वगैरे ज्या काही संस्था आहेत त्यांनी या निवडणूक निधीत आपल्या शक्तीनुसार
भर घालावी अशी विनंती आहे.
कोणत्याही व्यक्तीस अगर संस्थेस डॉ. साहेबांना परस्पर हारतुरे अगर निधीचा
हिस्सा देता येणार नाही. |
तिकीटा व्यतिरिक्त कोणासही सभा मंडपात प्रवेश मिळणार नाही. या कामी
समता सैनिक दलास खास अधिकार देण्यात आले आहेत.
सभेची तारीख, वेळ व जागा लवकरच जाहीर केली जाईल."
त्यानुसार मुंबई येथील परळच्या सेंट झेवियर मैदानावर तारीख
२२ नोव्हेंबर १९५१ रोजी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्याला
जत्रेचे स्वरूप आले होते. हजारो अस्पृश्य स्त्री-पुरुषांचा लोंढा