२८४ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
पोटात दुखू नोकरीच्या सवलतीपूर्वी मुदतीची मर्यादा नव्हती पण मुन्शींच्या लागले ! अस्पृश्यता जाईपर्यंत असलेली सवलत ठेऊ नये म्हणून कॉँग्रेसच्या काही सभासदांनी प्रेसिडेंटना अर्ज पाठवून दिला व या कलमाचा फेरविचार व्हावा म्हणून सुचविण्यात आले. या कलमाचा व काँग्रेस पार्टीचा काय संबंध तेच कळेना ! काँग्रेस पार्टीत या प्रश्नावर खडाजंगी झाली. अखेर मी राजीनाम्याचा घाट घातला तेव्हा ते कलम तसेच राहिले.
यात आणखी एका गोष्टीची सोय मी करून ठेवली आहे. घटनेच्या एका कलमानुसार अस्पृश्य व इतर अल्पसंख्यांक लोकांना संरक्षणार्थ एक सरकारी अधिकारी नेमला जावा व त्याने या जमातीवर होणाऱ्या अत्याचारांचा अहवाल संग्रहित करून तो पार्लमेन्टात सादर करावा.
मला वाटत होते की या जागेवर एका अस्पृश्याची नेमणूक होईल. कारण तुकोबा म्हणतात त्याप्रमाणे ' कळवळ्याची याती आणि लाभाविन प्रीती . पगारी आणि भाडोत्री माणूस नेमून काय होणार आहे ? यासाठी अस्पृश्य नेमण्यात यावा. आज अस्पृश्यात असे अधिकारी मिळणे दुरापास्त नाही. मला नेमलेल्या अधिकाऱ्याविरूद्ध काही म्हणायचे नाही. तरीपण एक शंका येते व ती ही की, अस्पृश्यांच्या खऱ्या जीवनाचा सत्य अहवाल असले काँग्रेस सरकार त्या अधिकाऱ्याला प्रसिद्ध करू देईल की नाही याची! कोण कसे छळतात हे
प्रसिद्धीस यावयाचे नाही.
काँग्रेस सरकारने अस्पृश्यांना सवलत देऊन पाहावयाचे होते. पण ही गोष्ट काँग्रेस कशी करील ? अस्पृश्यांच्या दुःखाचा उमाळा तीस कसा येइल ?
यापूर्वी म्हणजे ब्रिटिश राजवटीत मी एक्झिक्युटिव कौन्सिलर होतो व मजूर मंत्री होतो. मला अनेक प्रमुख खात्याचा अनुभव होता. माझा अनुभव दोन्ही राजवटीचा आहे. म्हणून मी राजवटीची तुलना करू शकतो. ही पुराणातील वांगी नाहीत. हा वांगेभात मी खाल्ला आहे. ( प्रचंड हंशा ) काँग्रेस राजवटीत अस्पृश्यांची प्रचंड अवहेलना झाली आहे. राजीनामा देताना काढलेल्या पत्रकात मी विस्तृतपणे खुलासा केला आहे, एवढेच नव्हे तर मंत्री असतानासुद्धा दिल्लीच्या एका सभेत काँग्रेस सरकारवर हा उघड आरोप केला होता.
अस्पृश्यांना राजकीय सवलतीचा उपभोग काँग्रेस सरकारने घेऊ दिला नव्हता, हा तो प्रमुख आरोप होता. माझ्या या विधानाला उत्तर देण्यास पंतप्रधान नेहरू यांना आजतागायत अवधी सापडला नाही ! माझ्या राजीनाम्याच्या पत्रात हे आरोप उघड केले असतानासुद्धा एकमेकाचा पत्रव्यवहार पार्लमेन्टपुढे वाचण्यापलीकडे अधिक बोलण्याचे पंडित नेहरूंना धैर्य झाले नाही. त्यांना उत्तर द्यायला भरपूर अवकाश होता. पुढे आठ दिवसांनी काँग्रेस अधिवेशन झाले.