एकांगी राजकारण कधीही यशस्वी होऊ शकत नाही २८५
त्यांना अनेकदा बोलण्याची संधी मिळाली असतानाही मी केलेल्या विधानांना समर्पक उत्तर देण्याची संधी पंडित नेहरूंनी घेतलेली नाही. उलट माझे प्रश्न टाळले. कारण मी जे म्हटले त्यात सर्व सत्य भरले आहे.
ब्रिटिश सरकारने पण अस्पृश्यांसाठी काही खास केले नव्हते. मुसलमान, खिश्चन व अँग्लो-इंडियन लोकांवरच कृपादृष्टी होती. मी १९४२ साली जेव्हा हिंदुस्थान सरकारचा कौन्सिलर झालो तेव्हा त्यांना पहिला प्रश्न विचारला की हा सापत्न भाव का ? त्यांनी म्हणजे ब्रिटिशांनी विशेष वितंडवाद न घालता आपली जबाबदारी कबूल केली. पण काँग्रेस सरकारला सांगून समजले नाही ! त्यावेळी इतर जमातीप्रमाणे तीन लाख रुपये अस्पृश्यांच्या शिक्षणासाठी ब्रिटिश सरकारने मंजूर केले.
पुढे मी काँग्रेस सरकारचा मंत्री झाल्यावर ही रक्कम वाढविण्यात आली व त्यात आणखी इतर वन्य जमातींचा समावेश करण्यात आला. अस्पृश्यांची खरी उन्नती कारकुनीत नाही. खरी उन्नती व्हावयाची असेल तर उच्च प्रकारचे शिक्षण मिळाले पाहिजे. साधे शिक्षण घेऊन कारकून होऊन काय उपयोग ! कारकून मनुष्य आयुष्यात काय करू शकतो. तो समाजाची घटना करू शकत नाही. उच्च शिक्षण घेऊन तज्ज्ञ झालेलाच समाजात आमूलाग्र आणि पोषक बदल करू शकतो. यासाठी ' माऱ्याच्या जागा ' अस्पृश्यांनी पटकावल्या पाहिजेत व त्यांना त्या मिळाल्या पाहिजेत. तीन लाख रुपये अशा विद्यार्थ्यांना पाश्चात्य देशात
पाठविण्यासाठी उपयोगात आणले जात होते. २०-३० अस्पृश्यांची मुले मी
कौन्सिलर असताना याचा फायदा घेऊ शकली. पण पुढे उच्च शिक्षणासाठी
१९४६ सालापासून अस्पृश्य पाठविणे बंद झाले ! अशारीतीने कॉग्रेस राजवटीत
अस्पृश्यांचा उच्च शिक्षणाचा अंकूर मोडून टाकण्यात आला.
दिल्ली सेक्रेटरीएटमध्ये अस्पृश्य शिपाई पण नव्हते ! एक दोन कारकून
होते. त्यांना शिपाई पाणी पण देत नसत ! मी काही अस्पृश्य शिप्रायांची सोय
करताच त्यांना तेथील जमादार रात्रपाळया देऊन हैराण करू लागला ! मी तिथे
गेल्यावर २४ किंवा २५ टक्के नोकरीच्या जागा राखून ठेवल्या. लढाईतील
' बेवीन बॉयज ' योजनेप्रमाणे काही शिकावू लोक इंग्लडला पाठविण्यात
येत. त्यात एकही अस्पृश्य तरूण नसे ! माझे अगोदर इतर समाजाच्या ५००
तरूणांची वर्णी लागली होती. शेवटी बारा पूर्णांक एक द्वितीयांश टक्के अस्पृश्य ' 1 तरूणांचा शिरकाव झाला व अस्पृश्यांची अदमासे शंभर मुले तो लाभ घेऊ
शकली. त्यावेळी तीन अस्पृश्य एविझिक्यूटिव्ह इन्जिनीयर्स लागले पण पुढे
म्हणजे काँग्रेसच्या राजवटीत एका तरी अस्पृश्याला वरची जागा मिळाली असेल
तर हराम ! (शेम-शेम)