२५-११-१९५१ लोकशाहीत विरोधी पक्षाची फार आवश्यकता असते - Page 332

डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे २९२

काँग्रेस काँग्रेसबद्दल काँग्रेसमध्ये किती घाण माजली आहे हे मोठेमोठे नेतेच

तिकीट घेण्यास साफ काय म्हणतात, त्यावरून पहा. खुद्द टंडणजींनी काँग्रेसचे

नकार दिला. बाबू संपूर्णानंद यांनी तेच केले. संपूर्णानंद म्हणाले की, काँग्रेसचे राजकारण म्हणजे गटाराचे राजकारण झाले आहे.

पंडित नेहरूंच्या मताविषयी मला अंदाज लागलेला नाही. ते कम्युनिस्ट,सोशालिस्ट, भांडवलदार धार्जिणे यापैकी काय आहेत, या प्रश्‍नाचे निश्‍चित उत्तर मी देऊ शकणार नाही. परंतु ते सर्वसामान्यपणे प्रगतीवादी आहेत असे मी मानतो. म्हणूनच त्यांचे सहकारी श्री. किडवाई जेव्हा काँग्रेसबाहेर पडले तेव्हा मी त्यांना म्हटले होते की, तुम्ही जर पंडित नेहरूंना घेऊन बाहेर पडणार असाल व सोशालिस्टांसारख्या प्रगतीशील पक्षांशी सहकार्य करणार असाल तर मी सुद्धा तुम्हाला येऊन मिळेन. पण ते चिखलात फसले आहेत त्याला कोण काय करणार? किडवाईत थोडासुद्धा राजनीतीचा अंश दिसला नाही.

लोकशाहीत कोणत्याही पक्षाच्या हाती अनियंत्रित सत्ता असू नये. त्यासाठी विरोधी पक्षाची फार आवश्यकता असते. इंग्लंड, अमेरिकेत किंवा फ्रांसमध्ये

असे दोन किंवा तीन पक्ष असल्यामुळे लोकशाही यशस्वी झाली आहे. त्यासाठीच आम्ही सोशालिस्ट व शेड्यूल्ड कास्ट्स्‌ फेडरेशन मिळून एक मजबूत विरोधी आघाडी उभारायचे ठरविले आहे. आमच्यात काही मतभेदाचे मुद्दे असले तरी साम्य पुष्कळ आहे आणि विशेष म्हणजे आम्हाला अशारितीने देशहित साधायचे आहे. देशात आमचे सरकार आम्ही स्थापू शकलो नाही, तरी सत्तारूढ पक्षाला लगाम घालू शकेल असा प्रबळ विरोधी पक्ष उभारू शकू .

भाषावार प्रांतरचनेबाबत सुद्धा आम्हाला झगडा करावा लागेल. कारण मुंबई शहर महाराष्ट्रापासून अलग करण्याचे डाव खेळले जात आहेत. नेहरूंचे मतही याबाबत महाराष्ट्राला प्रतिकूल आहे. हैदराबादचे विलीनीकरण करण्यास नेहरूंचा विरोध आहे. तेव्हा ही एक मोठी भानगडच होणार आहे.