२६-११-१९५१ सचोटी बाजूला ठेवून मी कृतज्ञ राहिलो तर तो मानवी व्यक्तीमत्त्त्वाचा वध आहे असे मी समजेन - Page 333

२८९
सचोटी बाजूला ठेवून मी कृतज्ञ राहिलो तर तो मानवी व्यक्तिमत्त्वाचा वध आहे असे मी समजेन

“निवडणूक प्रचाराचे एक उत्कृष्ट भाषण बाबासाहेबांनी सोमवार दिनांक २६ नोव्हेंबर १९५१ ला संध्याकाळी सर कॉवसजी जहांगीर हॉलमध्ये भरविण्यात आलेल्या जाहीर सभेत केले. या सभेचे अध्यक्ष बॅ. पुरुषोत्तम त्रिकमदास हे होते. यावेळी बाबासाहेब डोळे व गुडघे यांच्या आजाराने हैराण झालेले होते. डोळ्यांवर घड्या ठेवून डोळे दोन दिवस झाकून ठेवलेले होते. सभेत ते आले ते डोळ्यांवर घड्या घालून व वर काळा चष्मा लावून, दोन तीन माणसांच्या खांद्यावर हातांनी स्वतःचा भार टाकून. त्यांनी भाषण बसून करावे असा आग्रह सर्व समाजवादी व फेडरेशनच्या कार्यकर्त्यानी केला, पण बाबासाहेबांनी उभे राहूनच भाषण केले. ते भाषणाला उभे राहिले, तेव्हा सभेत टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. हॉलच्या बाहेर हजारो प्रेक्षक उभे राहिलेले होते तेही त्यात सामील झाले. औषधाच्या गोळ्याघेऊन बाबासाहेबांनी भाषणाला सुरुवात केली. राज्यकारभार निर्मळपणे चालवणे कसे जरूर आहे व असा कारभार, काँग्रेस पक्षीय सरकार चालविण्यास असमर्थ आहे. म्हणून जनतेने दुसऱ्या पक्षाचे सरकार सत्तेवर आणावे हे मुद्दे संयुक्तिक व सप्रमाण मांडून बाबासाहेबांनी प्रेक्षकांना दीड तास मंत्रमुग्ध करून सोडले. त्यांचे भाषण ऐकण्यास सर्व थरातील लोक, कायदे पंडित, श्रीमंत व्यापारी, समाजवादी, साम्यवादी व इतर नागरिक उपस्थित होते. अस्पृश्य अनुयायांची उपस्थिती तर विचारायलाच नको, एवढी असंख्य होती. भाषण संपले तेव्हा श्रोते बाबासाहेबांच्या भाषणाची प्रशंसा करीतच हॉलच्या बाहेर पडले.” *

''डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या भाषणात म्हणाले,

भगिनींनो आणि बंधुजनहो,

स. का. पाटील हे आपल्या मित्रांजवळ खाजगी रितीने असे सांगत आहेत की

माझ्या सुचनेमुळे आंबेडकरांना पहिल्या मंत्रीर्मडळात स्थान मिळाले आणि आता

ते कृतघ्न होऊन काँग्रेसवर व मंत्रीमंडळावर टीका करीत आहेत. ही माहिती

FENN क क य न्य च

° डॉ. भी. रा. आंबेडकर चरित्र : चां. भ. खैरमोडे, खंड १० वा पृ. २२६-२७.