२९४ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
खरी आहे काय ? असा प्रश्न सभेतील एका श्रोत्याने पारंभी मला विचारला होता. मला काँग्रेसच्या मंत्रिमंडळात स्थान कसे मिळाले ही माझ्या आयुष्यातील अत्यंत आश्चर्याची गोष्ट आहे. मला घटनासभेची सर्व दारे, खिडक्या आणि भेगासुद्धा बंद करण्यात आल्या होत्या, आम्ही इतर कोणालाही घटना सभेत घेऊ पण आंबेडकरांना येऊ देणार नाही अशी काँग्रेसवाल्यांची प्रतिज्ञा होती, पण मी बंगाल विधिमंडळातून प्रचंड मतांनी घटना सभेत निवडून गेलो. सिंहाच्या गुहेत सापडल्यासारखी माझी स्थिती होती. मी कोणाशीही बोलत नव्हतो, मी फक्त एकदा भाषण केले.
असे सहा महिने गेले. पुढे एक दिवस घटनासभेचे कामकाज संपल्यावर अकस्मात मला नेहरूंनी खोलीत बोलावून विचारले की तुम्ही मंत्रीमंडळात याल. का? मी सारासार विचार करून व सहकाऱ्यांच्या सल्ल्याने सहकार्याची संधी आली आहे असे समजून ते मंत्रीपद स्वीकारले. पुढे सरदार पटेल व राजाजी दोघेही म्हणू लागले की आमच्या सुचनेमुळे तुम्हाला मंत्रीमंडळात घेतले, आता त्यांच्या स्पर्धेत स. का. पाटील सामील आहेत असे दिसते. याच्यावरून मी एकच निष्कर्ष काढतो की मी काहीतरी चांगले काम केले असावे, म्हणून ही श्रेय घेण्याची स्पर्धा चालू आहे.
आता मी कृतघ्न झालो आहे असे लोक म्हणतात. पण मी ओ-कॉनल या आयरिश देशभक्ताच्या शब्दात त्यांना उत्तर देऊ इच्छितो, ते असे, “1४० man
can be grateful at the cost of his honour, no woman can be grateful at the
cost of her chastity, and no nation can be grateful at the cost of its ०७.” माझी सचोटी बाजूला ठेवून मी कृतज्ञ राहिलो तर तो मानवी व्यक्तिमत्त्वाचाच वध आहे असे मी समजेन. मला माझा प्रामाणिकपणा अधिक महत्त्वाचा वाटतो.
कोणतेही सरकार आज जनहित किती साधते याच्यावर त्याचे श्रेष्ठत्त्व अवलंबून आहे. अन्नवस्त्रादी प्रश्न तर महत्त्वाचे आहेतच, पण त्याहूनही महत्त्वाची गोष्ट म्हणजे राज्यकारभार किती शुद्धतेने केला जातो ही आहे. आपल्या देशात गेली चार वर्षे अन्नाचे दुर्भिक्ष, कापडाचे दुर्भिक्ष इत्यादि संकटे तर सतत येतच आहेत, पण सगळ्यात महत्त्वाचा दोष कोणता असेल तर तो म्हणजे अशुद्ध व लाचबाजीने भरलेले राज्यशासन. राज्यशासन शुद्ध राखण्यास तर. काही बाहेरची मदत लागत नाही. फक्त शुद्ध राखण्याची इच्छा पाहिजे. राज्यशासन आज शुद्ध राखण्यात मोठी अडचण काँग्रेसपुढे कोणती असेल तर ती म्हणजे काँग्रेसलाच ती शुद्धता ठेवण्याची इच्छा नाही