२६-११-१९५१ सचोटी बाजूला ठेवून मी कृतज्ञ राहिलो तर तो मानवी व्यक्तीमत्त्त्वाचा वध आहे असे मी समजेन - Page 336

आणि भाषणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन २९६

पक्षाच्या नावाने उधळता निवडणूक निधीचे पैसे वारेमाप कोणत्याही उमेदवारावर

मी त्यासाठी खूप आले नसते. पण मला हेही कलम शेवटी गाळावे लागले.

झुंज दिली, पण शेवटी हरलो.

मला सांगा की ही प्रवृत्ती लोकशाहीच्या पावित्र्याशी सुसंगत आहे काय? प्रत्येक देशातील निवडणूक कायद्यात अशा प्रकारचे कलम आहे. कोणताही लोकशाही निष्ठ पक्ष हे सहन करणार नाही. कारण कोणताही कायदा कितीही चांगला असला तरी तो व्यवहारात कशा पद्धतीने येतो याला राज्यकारभारात महत्त्व आहे.

हे झाले राज्यशासनातील दोष: मला मी दिल्लीहून इकडे येताना असे कळले की या भागात काही ठिकाणी स्थानिक काँग्रेस नेते न्यायाधीशांवर दडपण आणून आपल्या मनासारखे निर्णय लाऊन घेण्याचा प्रयत्न करतात. आपल्या

राज्यघटनेत कायदा हा सर्वाना समान लेखील असे म्हटले आहे. अशाप्रकारचा हस्तक्षेप झाला तर या देशाचे काय होईल हे मी सांगू शकत नाही.

मला वाटते काँग्रेसने या देशात विरोधी पक्षांना चिरडून टाकण्याची भाषा

बोलण्यापेक्षा ते वाढावेत म्हणून उत्तेजन द्यावयाला हवे. ज्या देशात पार्लमेन्टरी

लोकशाही आहे तेथे अनेक पक्ष नाहीत काय ? मग तुम्हाला येथे भीती का वाटते ? अशी दडपशाही करणारी कॉंग्रेस विस्तवाशी खेळ खेळत आहे. तीच गोष्ट पैसेवाल्यांची. हे धनिक एखाद्या पक्षाला निवडणूक निधीला पैसे देऊन स्वतःचे वर्चस्व लादू पाहात आहेत. त्यांनी हे लक्षात ठेवावे की, हेही घातक ठरेल. तसेच सरकारी अधिकारी सत्तारूढ पक्षांपुढे नमून वर्तन करतील तर

स्वतंत्र व शुद्ध निःपक्षपातीपणे निवडणुका होणार नाही, त्यांनी स्वकर्तव्य निष्ठेने

व निष्पक्षपणे केले पाहिजे.

कोणतेही सरकार बिनचूक कारभार करीत नाही. प्रत्येकाकडून प्रमाद हे घडतातच. पण ते दाखविण्यासाठी जनतेला सरकारच्या चुकांची माहिती होण्यासाठी विरोधी पक्षाची आवश्यकता असते. इंग्लंड, कॅनडा या देशात विरोधी पक्षाला अधिकृत मान्यता असते, त्याच्या नेत्यांना सरकारी पगार मिळतो.