सचोटी बाजूला ठेवून मी ....... असे मी समजेन २९७
शेड्यूल्ड कास्ट्स् फेडरेशन व समाजवादी यांच्या निवडणूक सहकार्याबद्दल लोकांना वैषम्य का वाटते याविषयी मला आश्चर्य वाटते. मी जातीने अस्पृश्य आहे. तसे मी राजकारणातही अस्पृश्य राहावे अशी या लोकांची इच्छा आहे काय ? कदाचित मी काँग्रेसमध्ये गेलो नाही म्हणून त्यांना वैषम्य वाटत असावे.
या देशातील राज्यकारभार शुद्ध ठेवण्याचा प्रयत्नही ज्या काँग्रेसने केला नाही त्या काँग्रेसला पुन्हा निवडून द्यावयाचे की नाही हे तुम्हीच ठरवा ! ["' ] [* ]
" जनता : ५ डिसेबर १९५१.