२९१
अल्पसंख्य जमातीचे मूलभूत हक्क
शाबीत राहिले पाहिजे
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शुक्रवार ता. २१ डिसेंबर १९५१ रोजी मुंबईतील महमद अली रोडवर बेग महमद बाग येथे मुसलमान बंधुंच्या प्रचंड प्रचार समेत भाषण केले. ते म्हणाले
माझ्याकडे साथी हँरीस आणि इतर काही मुसलमान बंधु आले आणि म्हणाले की आपण मुसलमान बंधुंना चार उपदेशाच्या गोष्टी सांगा. ते काँग्रेसकडे झुकले आहेत. काँग्रेसने आपणावर उपकार केले, असे त्यांना वाटत आहे. -
मला या गोष्टीचे आश्चर्य वाटले; नव्हे तर चीड आली आणि म्हणूनच देशातील खरी परिस्थिती मुसलमान बंधुंना सांगावी म्हणून येथे मी आलो आहे.
काँग्रेसने मुसलमानांसाठी कारके लेनआहे*? - - तुम्हाला वाटेल की १९४७ च्या दंगलीमध्ये काँग्रेसने तुमचे प्राण वाचविले. पण ही तुमची समजूत साफ चुकीची आहे. उलट ह्या कॉँग्रेसवाल्यांनी तुम्हाला आश्रय न देता गुंडांना प्रोत्साहन देऊनच ही दंगल वाढविली आणि तुम्हाला भयभीत केले. ते इतके की काँग्रेसशिवाय दुसरा कोणी या देशात तुमचा आता वाली राहिला नाही!
यावरून तुम्ही जी कृतज्ञता काँग्रेसला दाखवित आहात तिला काँग्रेसची पात्रता आहे काय ? पंडित नेहरूंबद्दल तुम्ही भलतीच अपेक्षा. करून गोडवे गात आहात. या पंडितजींचे धोरण धरसोडीचे आहे. त्यामुळे तुम्ही अखेर पस्तावाल. लोकशाहीच्या राज्यात नेहरू घराण्याची प्रधानकी परंपरा आपणास सुरू ठेवायची नाही. एवढेच. नव्हे तर आपणासारख्या अंधश्रद्धाळू लोकांचा फायदा घेऊन ती टिकविण्याचा प्रयत्न कुणी केला तरी जागृत समाज अशी [परंपरा ]
चालू देणार नाही
` काँग्रेस ही पुढच्या निवडणुकीत हमखास निवडून येत नाही. ती आता शेवटचा श्वास घेत आहे. आपल्या देशातील इतर जमाती जशा राजकीय हक्कांसाठी जागृत झाल्या आहेत तसेच तुम्हीपण पूर्वीचा जोम कायम ठेवून राजकीय हक्क मिळविण्यासाठी झगडले पाहिजे.
जनता : २२ डिसेंबर १९५१.