आणि भाषणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन ३००
घटना तयार करताना काँग्रेसने अल्पसंख्यांकांच्या राजकीय भवितव्याचा विचार करण्यासाठी नेमलेल्या समितीची सभा ज्या दिवशी होती त्याच्या आदल्या दिवशी मी काँग्रेसचे प्यादे मौलाना आझाद यांना भेटलो व त्यांना अल्पसंख्यांकांच्या सर्व प्रश्नांची व भवितव्याची इत्थंभूत कल्पना करून दिली. पण हे मौलाना दुसऱ्या दिवशी सभेत हजर न राहाता निघून गेले. मुसलमान बंधु तद्वत इतर अल्पसंख्यांकांचा प्रश्न माझ्याशिवाय तिथे कुणी मांडू शकला नाही आणि मी आपल्यावतीने एकटाच असल्यामुळे पंडित नेहरूंनी मुसलमानांना राखीव जागा देण्याच्या सूचनेला काँग्रेसच्या वतीने विरोध केला व त्यामुळे आपण राजकीय
हक्कांना मुकलात.
सर्वधर्मीय समानतेचे सरकार आहे, असे जे काँग्रेस म्हणते ती एक निव्वळ त्यांची थाप आहे. कारण आपल्या घटनेमध्ये अशी तरतूद मी करून ठेवली आहे की कोणत्याही जातीवर, धर्मावर व रूढीवर कुणाचेही वर्चस्व असता कामा नये व त्यांचे मूलभूत हक्क शाबीत राहिले पाहिजेत. असे असता काँग्रेसने मुसलमानांची संख्या लखनौ सारख्या ठिकाणी जास्त असतानाही आणि तेथे पन्नास मुसलमान उमेदवार सहज निवडून येणे शक्य असतानाही फक्त दहा बारा
मुसलमान उमेदवारच उभे केले हे ध्यानात ठेवा.
यावरून या निवडणुकीत कोणाला मत द्यावयाचे ते ठरवा. मी तर म्हणतो की आपण सोशालिस्ट व दलित फेडरेशनला साहाय्य करावे व देशाचे भवितव्य
सुधारावे.